BMC Election: कार्यकर्त्यांनो लागा कामाला! तीन तासांत महापालिका निवडणुकीची घोषणा, जिल्हा परिषद, पंचायत समितीचं काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Municipal Corporation Election: राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी जळपास पूर्ण केली आहे.आज सायंकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून महापालिका निवडणुकांची घोषणा अपेक्षित आहे.
मुंबई: मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठीची आचारसंहिता आजचं जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी जळपास पूर्ण केली आहे. आज सायंकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून महापालिका निवडणुकांची घोषणा अपेक्षित आहे. तर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे १४ डिसेंबर रोजी सूप वाजले. त्यानंतर तब्बल सात-आठ वर्षे रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबरनंतर केव्हाही होऊ शकते, असे म्हटले जात होते. त्यानंतर आता येत्या २४ तासांमध्ये महापालिका निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद...
advertisement
राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. २९ महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होण्याची चिन्हे आहेत. तर, आरक्षणाच्या मुद्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
advertisement
जिल्हा परिषदेची निवडणूक आरक्षणाच्या मुद्यावर विलंबाने होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक ही दोन टप्प्यात ही जाहीर केली जाऊ शकते. ५० टक्के आरक्षण न ओलांडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचा डबल बार उडणार?
जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महापालिका निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता मात्र, २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबतची प्राथमिक चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2025 12:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: कार्यकर्त्यांनो लागा कामाला! तीन तासांत महापालिका निवडणुकीची घोषणा, जिल्हा परिषद, पंचायत समितीचं काय?










