advertisement

भाजपच्या बाजूने Exit Poll, आचारसंहिता भंगाचा राज्यातील पहिला गुन्हा दाखल, धाराशिवमध्ये तिघांना दणका

Last Updated:

सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आले होते.

धाराशिवमध्ये आचार संहिता भंंगाचा पहिला गुन्हा दाखल
धाराशिवमध्ये आचार संहिता भंंगाचा पहिला गुन्हा दाखल
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीतील आचारसंहिता भंगाचा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. मतदानाआधीच एक्झिट पोल दाखवून तो समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी धाराशिव 2.0 यासह तीन फेसबुक पेज आणि युट्युब चॅनलवर कलम 223, 337, 353 ,66(ड) नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मतदानाआधी किंवा मतदान सुरू असताना एक्झिट पोल दाखवू नये, असा नियम आहे. मात्र नियमाला हरताळ फासून काहींनी एक्झिट पोल दाखवला होता.

सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येईल, एक्झिट पोल दाखवणं महागात

advertisement
सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आले होते. धाराशिव 2.0, जिल्हा धाराशिव, ऑल अबाउट धाराशिव यासह अनेक अॅडमिनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडून तिघांना दणका

संबंधित एक्झिट पोलवर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. आक्षेप तक्रारीनंतर बारा दिवसांनी कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅडमिनला अटक करणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.
advertisement
मतदाना अगोदरच टीव्ही चॅनेल तसेच समाज माध्यमांवर एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तक्रार देऊनही बारा दिवसांपासून प्रशासन गुन्हा दाखल करत नसल्याने विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपच्या बाजूने Exit Poll, आचारसंहिता भंगाचा राज्यातील पहिला गुन्हा दाखल, धाराशिवमध्ये तिघांना दणका
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement