एका योजनेमुळे दुसरी योजना बंद करण्याची वेळ? यंदा दिवाळीत 'आनंदाचा शिधा' नाही?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार अधिक असल्याने इतर योजनांसाठी निधी कमी पडत असल्याची चर्चा आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली आनंदाचा शिधा ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्याच काळात सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच आनंदाचा शिधा योजनेला खिळ बसण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.
निमित्त ठरलं ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानाचं. यंदा दिवाळीत आनंदाचा शिधा वाटपाबाबत कोणतीही हालचाल नाही. कारण वित्त विभागानं निधी नसल्याचं सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर आर्थिक भार, इतर योजनांसाठी निधी कमी
लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार अधिक असल्याने इतर योजनांसाठी निधी कमी पडत असल्याची चर्चा आहे. ऐन दिवाळापूर्वी महाराष्ट्रातील शेतकरी पाऊस आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालंय. राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला दिवाळी पूर्वी आनंदाचा शिधाच्या माध्यमातून मदत दिली जात होती. मात्र सध्या ही योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. गरीब, गरजूंसाठी आनंदाचा शिधावाटप करण्यात येत होता. एकनाथ शिंदेंचे नाव होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंदाचा शिधा बंद केला, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
advertisement
आनंदाचा शिधा यंदा गोरगरिबांना मिळणार नाही
आनंदाचा शिधा योजनेची घोषणा सर्वप्रथम 2022 मध्ये दिवाळीच्या तोंडावर करण्यात आली होती. राज्यातील गोरगरीबांना सणाच्या काळात घरात गोडधोड करता यावे, यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळात रेशनच्या दुकानांवर किट वितरित केले जायचे. यामध्ये एक किलो चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता. केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना 100 रुपये या सवलतीच्या दरात चार पदार्थ देण्यात आले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 10:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एका योजनेमुळे दुसरी योजना बंद करण्याची वेळ? यंदा दिवाळीत 'आनंदाचा शिधा' नाही?