FASTag: 1 एप्रिलपासून FASTag अनिवार्य, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
maharashtra cabinet meeting FASTag decision: टोल नाक्यांवर गाड्यांसाठी लागणारा वेळ आणि ट्रॅफिकची समस्या टाळण्यासाठी हा निर्णय सक्तिचा करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: तुम्ही गाड्यांना फास्ट टॅग अजूनही लावलं नसेल किंवा नंतर बघू अशा भ्रमात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता फास्ट टॅग गाड्यांवर लावणं कंपल्सरी करण्यात आलं आहे. 1 एप्रिलपासून गाड्यांवर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. टोल नाक्यांवर गाड्यांसाठी लागणारा वेळ आणि ट्रॅफिकची समस्या टाळण्यासाठी हा निर्णय सक्तिचा करण्यात आला आहे. आज 7 जानेवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नियमांनुसार, जर तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला टोल टॅक्सच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल. याचाच अर्थ जर फास्टॅग टोल 90 रुपये असेल, तर तुम्हाला पासशिवाय 180 रुपये भरावे लागतील. या नियमाचं आता 1 एप्रिलपासून कठोरपणे पालन केलं जाणार आहे. काहीजण फास्ट टॅग गाडीवर न लावता काचेवर टोल नाका आला की धरुन ठेवायचे मात्र हे देखील आता चालणार नाही.
advertisement
ई-कॅबिनेटच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. बैठकीतील प्रस्तावांचे टीपण आणि इतर माहिती टॅबवर उपलब्ध करुन दिली जाणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी आणखी एक निर्णय म्हणजे महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करणार आहे.
शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल करणार. मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणे, मा. राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती इत्यादी बाबींसंदर्भात तरतुदी करण्यात आल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 1:09 PM IST