भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, प्रकरण नेमकं काय?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Unmesh Patil: देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५.३३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप उन्मेष पाटील यांच्यावर आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी, चाळीसगाव : देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५.३३ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कुठल्याही क्षणी उन्मेष पाटील यांच्या सह दोघांना अटक होण्याची शक्यता आहे
देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५.३३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आरोप आहे. उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडे गहाण मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. उन्मेष पाटील यांच्यावर अटकेच्या कारवाईची शक्यता आहे.
राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हा दाखल
गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवगिरी बँकेने राजकीय संगनमतातून, सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केला. बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिले त्या कंपनीच्या संचालक मंडळात मी नाही, मी त्या कंपनीचा कुठलाही भागीदार नाही. मी जामीनदार होतो आणि म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मला नंबर एकचा आरोपी करण्यात आले आहे. मी या कंपनीचा कुठलाही भाग नसताना राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हा दाखल झाला, असे उन्मेष पाटील म्हणाले.
advertisement
पार्थ पवार ते गिरीश महाजन... त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही?
मला विचारायचं आहे पार्थ पवार 99% भागीदार तिथे गुन्हा दाखल होत नाही. गिरीश महाजन यांच्या कुटुंबाच्या नावाने बी. एच. आर. चे ॲसेट खरेदी केले जातात, ठेवीदारांच्या पैशातून रुपयाच्या वस्तू माफक दरात खरेदी केला जातात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. वरद इन्फ्रा चाळीसगावच्या आमदारांची कंपनी आहे तसेच सुप्रीमो कंपनी टॅक्स, ॲसेट नाही, तरी शेकडो कोटीच्या जमिनी माफक दराने कशा घेतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही का? असे सवाल उन्मेष पाटील यांनी विचारले.
advertisement
कर्जाच्या पाचपट माझी मालमत्ता सील केली
देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या प्रकरणात मी जामीनदार होतो. कर्जाच्या पाचपट माझ्या प्रॉपर्टी अटॅच केल्या आहे. कर्जाच्या 10% व्हॅल्युएशन नसणाऱ्यांना दहापट कर्ज दिले जाते. देवा भाऊ हा न्याय कुठला? जेव्हा मी बीएचआरवर बोलतो, तेव्हा यांना झोंबते आणि तीन दिवसात माझ्यावर गुन्हा दाखल होतो. इतक्या महिन्यांपासून माझ्यावर गुन्हा दाखल का झाला नाही? तीनच दिवसात पुन्हा कसा दाखल झाला, असेही उन्मेष पाटील म्हणाले.
advertisement
भाजपच्या त्याच लोकांनी मला गोवले, पण मी थांबणार नाही
मंगेश चव्हाण, गिरीश महाजन, बँकेचे चेअरमन, बँकेचे एमडी, बँकेचे मॅनेजर, रिकवरी ऑफिसर यांचे CDR तपासाव्यात, अशी मागणी उन्मेष पाटील यांनी केली आहे. निवडणूक जवळ आली मी बोलायला लागलो. अनेक महिन्यात गुन्हा दाखल झाला नव्हता तो गुन्हा तीन दिवसांत कसा दाखल झाला? भाजपशी माझा वाद आणि वैर नव्हतेच. भाजपतील या प्रवृत्ती विरोधात माझा लढा होता. ही प्रवृत्ती बदला घेण्यामध्ये मग्न होती. एकनाथ खडसे, सुरेश जैन यांना या प्रवृत्तीने काढले. या प्रवृत्ती विरोधात मी होतो. यांच्यासोबत मी काम करू शकत नव्हतो. भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपाला सोडून स्वाभिमानाच्या लढाईसाठी सज्ज झालो. मला कल्पना होती अनेकांना जसं गोवण्यात आले तसे मलाही गोवण्यात येईल. पण माझ्या मनाची पूर्ण तयारी होती. जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत होत असते. जेवढे अडथळे आणतील तेवढी ताकद माझ्यात येईल. या प्रवृत्ती विरुद्ध आम्ही लढू आणि यांना गाडू. काहीही झाले तरी उन्मेष पाटील थांबणार नाही, काही तास न्यायप्रविष्ठ असल्याने थांबत आहे मी पुन्हा आपल्यासमोर येईल.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
November 12, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपचे माजी खासदार उन्मेष पाटील यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, प्रकरण नेमकं काय?


