नवीनच घेतलेली बाईक, ट्रकला धडकून भीषण अपघात; गाडीचे तुकडे, तीन तरुणांचा मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अपघातात मृत्यू झालेले तिघेही अहेरी तालुक्यात असलेल्या गोविंदगावचे ते रहिवाशी होते.
गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर मुरखळा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकमेकांचे नातेवाईक असलेल्या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसून हा अपघात झाला. या अपघातातील तरुणांचे वय अवघे २० ते २३ वर्षे इतके आहे. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री ८ च्या सुारास तिन्ही तरुण गडचिरोलीच्या दिशेने येत होते. नवीनच घेतलेल्या दुचाकीची मुरखळा गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. या अपघातात तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय दशरथ पेंदाम, अजित रघू सडमेक, अमोल अशोक अर्का अशी तरुणांची नावे आहेत. तिघेही गोविंदगाव इथं राहत होते.
advertisement
अपघात इतका भीषण होता की नव्या कोऱ्या दुचाकीचे दोन तुकडे झाले. अपघातात मृत्यू झालेले तिघेही अहेरी तालुक्यात असलेल्या गोविंदगावचे ते रहिवाशी होते. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या तरुणांच्या निधनाने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. एका तरुणाचे वडील पोलिसात असल्याचे समजते. अपघातानंतर तिघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आली. दरम्यान, अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 10, 2024 2:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
नवीनच घेतलेली बाईक, ट्रकला धडकून भीषण अपघात; गाडीचे तुकडे, तीन तरुणांचा मृत्यू


