ठरलं तर! टीम इंडिया सेमी फायनलमध्ये बलाढ्य संघाशी भिडणार, कधी आणि कुठे आहे सामना?

Last Updated:

आज ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेचा 7 विकेटसने पराभव केला आहे.या सामन्याच्या निकालानंतर आता सेमी फायनलच गणित जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे टीम इंडियासोबत सेमी फायनलमध्ये कोणता संघ भिडणार?

India W vs Australia W
India W vs Australia W
India W vs Australia W Semi Final : आयसीसी वुमेन्स वर्ल्डकपच्या सेमी फायनलसाठी ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड आणि इंडिया हे चारही संघ क्वालिफाय झाले आहेत. आज ऑस्ट्रेलियाने साऊथ आफ्रिकेचा 7 विकेटसने पराभव केला आहे.या सामन्याच्या निकालानंतर आता सेमी फायनलच गणित जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे टीम इंडियासोबत सेमी फायनलमध्ये कोणता संघ भिडणार? आणि हा सामना नेमका कधी खेळवला जाणार आहे. हे जाणून घेऊयात.
खरं तर आजच्या सामन्यात साऊथ आफ्रिका संघ प्रथम फलंदाजी करताना 97 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 7 विकेटस राखून पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर सेमी फायनलच गणित जवळपास स्पष्ट झालं आहे. कारण आज ऑस्ट्रेलिया साखळी फेरीतला शेवटचा सामना जिंकुन 13 गुणांसह पहिल्या स्थानी कायम राहिली आहे. त्यांचा रनरेट हा +2.102 आहे.तर दुसऱ्या स्थानी आजच्या सामन्यात पराभूत झालेला साऊथ आफ्रिका आहे. आफ्रिकेचे आता 10 गुण आहेत आणि रनरेट -0.420 आहे.
advertisement
आता यानंतर इंग्लंड आणि भारताचा साखळी फेरीतला एक एक सामना उद्या खेळवला जाणार आहे. आता इंग्लंड जर रविवारी न्यूझीलंडविरूद्ध जिंकली तर त्यांचे गुण 11 होणार आहेत. आणि भारताने जरी बांग्लादेशचा पराभव केला तरी त्यांचे गुण 8 होणार आहे.त्यामुळे या सामन्यांमुळे फक्त गुण वाढणार आहेत, संघाच्या क्रमवारीत कोणताही बदल होणार नाही आहे.त्यामुळे सेमी फायनलच चित्र स्पष्ट झालं आहे.
advertisement
पहिल्या आणि चौथ्या संघात सेमीफायनल
पॉईंटस टेबलमध्ये पहिल्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि चौथ्या स्थानी असलेल्या भारत यांच्यात सेमी फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा गुरूवारी 30 ऑक्टोबर 2025 ला नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमी फायनल हा दुसऱ्या स्थानी असलेल्या साऊथ आफ्रिका आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार आहे.हा सामना बुधवारी 29 ऑक्टोबर 2025 ला गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमला खेळवला जाणार आहे.
advertisement
दरम्यान या दोन सामन्यातून विजय मिळवणारे दोन संघ फायनलमध्ये भिडणार आहेत. हा सामना 2 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहेत.हे दोन संघ कोण असणार आहेत? हे सेमी फायनल सामन्यानंतर स्पष्ट होतील.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ठरलं तर! टीम इंडिया सेमी फायनलमध्ये बलाढ्य संघाशी भिडणार, कधी आणि कुठे आहे सामना?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement