Gadchiroli Flood : गडचिरोलीला पावसानं झोडपलं, भीषण पूरस्थिती, अनेक तालुक्यांचा संपर्क तुटला

Last Updated:

गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

News18
News18
गडचिरोली, महेश तिवारी, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू असल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पाल नदीला पूर आल्यानं  गडचिरोली-आरमोरी मार्ग बंद झाला आहे, त्यामुळे गडचिरोलीचा नागपूरशी संपर्क तुटला आहे. तर रात्री शिवणी नाल्यावर पाणी आल्यानं गडचिरोली -चामोर्शी मार्ग देखील बंद झाला आहे.
गडचिरोली -चामोर्शी मार्ग बंद झाल्यानं दक्षिण गडचिरोलीतल्या पाच तालुक्यांचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात रात्रीपर्यंत 27 मार्ग बंद होते आता ही संख्या वाढून 30 च्या वर गेली आहे. पाऊस सुरूच असल्यामुळे पुराचा धोका आणखी वाढला आहे. पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या अशीच स्थिती आहे. वर्ध्यात सलग तिसऱ्या दिवशीही रात्रभर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं  नद्या व नाले तुडूंब भरून वाहत आहेत. वडद इथल्या भदाडी नदीला मोठा पूर आल्यानं रात्रभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.  हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने पुढील 24 तास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे.  आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. तसेच यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gadchiroli Flood : गडचिरोलीला पावसानं झोडपलं, भीषण पूरस्थिती, अनेक तालुक्यांचा संपर्क तुटला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement