Gadchiroli News : कचरावेचक महिलांना मिळाला आधार, आता अशाप्रकारे होतोय फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
कैकाडी जमातीतील महिला या प्लास्टिक, कार्डबोर्ड या कचरा गोळा करतात.
गडचिरोली, 6 नोव्हेंबर : महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये विविध जाती जमाती आहे. यातीलच एक जमात म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील कैकाडी जमात. ही जमात तशी मागासवर्गीय म्हटली जाते. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये या जमातीचे वास्तव्य आहे. या समाजाची मूळ भाषाही कैकाडी. कैकाडी म्हणजे मराठीत त्याचा अर्थ रानटी डुक्कर असा होतो.
कैकाडी जमातीतील माणसे ही साधारणपणे मैला वाहणे, कचरा उचलणे तसेच सेप्टिक टँक साफ करणे ही कामे करतात. 80 टक्के जमात ही कचरा उचलते, तसेच वराह पालन करते. पण याच समाजातील महिलांना आता चांगल्या प्रकारे रोजगार मिळताना दिसत आहे.
कचरा वेचक महिलांना मिळाला आधार
कैकाडी जमातीतील महिला या प्लास्टिक, कार्डबोर्ड या कचरा गोळा करतात. त्यातून त्यांना तुटपुंजा पगार मिळतो. मात्र, युवा परिवर्तन सामाजिक संस्था आणि एचएसबीसी यांच्या प्रयत्नाने त्यांच्या आयुष्यात आता बरचसे परिवर्तन येऊ लागले आहे. त्यांना आता शेती, आरोग्य चाचणी याचबरोबर त्यांना उपजिवीकेचे साधनही उपलब्ध करून दिले जात आहे.
advertisement
युवा परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी या कचरावेचक महिलांकडून त्यांच्या विविध प्रकल्पासाठी लागणारे सामान विकत घेतले आहे. याचे त्यांना आता पुरेसे मानधनही मिळाले आहे. प्लॅस्टिक कचरा आणि विविध सामानाच्या बॉटल्स विकून त्यांना प्रत्येक प्लास्टिकच्या बाटलीमागे 2 रुपये मिळत होते. मात्र, आता याचसाठी त्यांना आता आधीच्या तुलनेत दुप्पट पैसे मिळत आहेत.
तसेच कचऱ्यातून मिळणाऱ्या विविध कपड्यापासून पायपुसणी, गोळ्या तसेच औषधे तसेच पाण्याची बाटली ठेवण्यासाठी पाऊच या बायका तयार करतात. या माध्यमातूनही या महिलांना युवा परिवर्तनच्या सहाय्याने चांगला रोजगार मिळत आहे.
advertisement
कल्पना वंदारी या दिवसातून 6 तास कचरा वेचण्याचे काम करतात. युवा परिवर्तनचे मार्गदर्शन मिळाल्यापासून त्यांच्या जीवनात चांगला बदल झाला आहे. आधी कचरा विकून आधी वंदना दर वर्षाला 1830 रुपये कमवायच्या. युवा परिवर्तनच्या मार्गदर्शनानंतर त्या आता वर्षाला 4600 रुपये कमावत आहेत.
सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेल्या या मदतीमुळे कैकाडी समाजातील अनेक कुटुंबाना रोजगार मिळाला आहे. युवा परिवर्तनच्या माध्यमातून वंचित समाजातून येणाऱ्या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. यासाठी काही व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमही चालवले जातात.
view commentsLocation :
Gadchiroli,Maharashtra
First Published :
November 06, 2023 2:50 PM IST


