मोठी बातमी! एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या; दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेल्या नातीनीही गमावला जीव, गडचिरोली हादरलं

Last Updated:

गडचिरोलीमधून महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
गडचिरोली, 8 डिसेंबर : गडचिरोलीमधून महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये आजी, आजोबांसह नातीचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातल्या गुंडापुरीमध्ये हे हत्याकांड घडलं आहे. हत्या नेमकी का करण्यात आली, याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात अशीच एक खळबळजनक घटना घडली होती. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार जिल्ह्यातून समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवू दसरू कुमोटी वय साठ वर्ष, बिच्चे देवू कुमोटी वय 55 वर्ष दोघे राहणार गुंडापुरी ता. भामरागड आणि अर्चना रमेश तलांडे वय दहा वर्ष राहणार येरकल तालुका एटपल्ली अशी हत्या झालेल्या तिघांची नावं आहेत.
advertisement
देवू कुमोटी यांची विवाहित मुलगी एटापल्ली तालुक्यात राहाते, त्यांची मुलगी अर्चना ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या आजी-आजोबांकडे आली होती. या घटनेत तिचाही मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. तिघांचे गळा चिरलेल्या अवस्थेमधील मृतदेह घरात आढळून आल्यानं खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
मोठी बातमी! एकाच कुटुंबातील तिघांची गळा चिरून हत्या; दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेल्या नातीनीही गमावला जीव, गडचिरोली हादरलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement