Breaking news : 24 तासांच्या आत नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलावर मोठा हल्ला; काल पोलिसांनी केला होता 12 जणांचा खात्मा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मोठी बातमी समोर आली आहे, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर मोठा हल्ला केला असून, या घटनेत दोन जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान गंभीर जखमी झाले आहेत.
गडचिरोली, महेश तिवारी, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर आली आहे, बुधवारी महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 माओवादी ठार झाले होते, या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच नक्षलवाद्यांकडून सुरक्षा दलावर मोठा हल्ला करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर आज मोठा हल्ला केला असून, दोन जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान गंभीर जखमी आहेत. विजापूर जिल्ह्यात तर्रीम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात जवान अभियानावर निघाले असता माओवाद्यांनी आयईडी स्फोट कोला.
या स्फोटात सहा जवान गंभीर जखमी झाले होते, त्यातील दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित चार जवान गंभीर जखमी असून त्यांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी नेण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 माओवादी ठार झाले होते सुमारे सहा तास ही चकमक सुरू होती, त्यानंतर आता नक्षलवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे.
advertisement
बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली 7 सी 60 पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. वांडोली गावाजवळ 12-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या कारवाईदरम्यान सुमारे 6 तासांहून अधिक काळ गोळीबार सुरू होता. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 12 माओवादी ठार झाले आहेत. यावेळी तीन एके ४७, २ INSAS, १ कार्बाइन आणि १ एसेलआर अशी ७ स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
Location :
Gadchiroli,Gadchiroli,Maharashtra
First Published :
July 18, 2024 8:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Breaking news : 24 तासांच्या आत नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलावर मोठा हल्ला; काल पोलिसांनी केला होता 12 जणांचा खात्मा

