Operation Sindoor Decoration : लाडक्या बाप्पाजवळ साकारला 'ऑपरेशन सिंदूर'चा अनोखा देखावा, डेकोरेशनने वेधलं लक्ष
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Operation Sindoor Decoration : मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील महेंद्र वाळुंज यांच्या घरी या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावे सादर करणारे वाळुंज यावर्षी समाजासमोर देशभक्ती जागवणारा एक अनोखा संदेश घेऊन आले आहेत.
एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू. हल्ल्याच्या काही दिवसांनंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादाचे तळ नेस्तनाभूत करून त्यांच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या. पाकिस्तानने भारतावर केलेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेल्या लढाईला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव ठेवण्यात आलं होतं. 'ऑपरेशन सिंदूर' या भारतीय सैन्याच्या ऑपरेशनची फक्त देशातच नाही तर, अख्ख्या जगात किर्ती पसरली आहे.
सध्या गणेशोत्सवातही भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा पाहायला मिळत आहे. 'ऑपरेशन सिंदूर'चा देखावा यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे आगमन घरोघरी झाले. त्यासाठी घरोघरी विविध संकल्पना राबवत लाडक्या बाप्पा समोर डेकोरेशन केले जाते. देशामध्ये घडणाऱ्या चालू घडामोडींवर अनेक देशप्रेमी गणेशोत्सवात देखावा बनवण्याचा प्रयत्न करत असतात. यावर्षी सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील महेंद्र वाळुंज यांच्या घरी या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावे सादर करणारे वाळुंज यावर्षी समाजासमोर देशभक्ती जागवणारा एक अनोखा संदेश घेऊन आले आहेत. पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय जवानांनी केलेले “ऑपरेशन सिंदूर” यावर आधारित प्रभावी देखावा त्यांनी आपल्या घरी साकारला आहे. या देखाव्यात भारतीय जवानांची शौर्यगाथा, सीमेवरील परिस्थिती आणि दहशतवाद्यांचा केलेला प्रतिकार याचे हृदयाला भिडणारे चित्रण पाहायला मिळते.
advertisement
विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा कागदी पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंमधून साकारण्यात आला आहे. पर्यावरणाचा विचार करून, कमी खर्च आणि मर्यादित वेळेत, अवघ्या दहा दिवसांत उभारलेला हा देखावा आकर्षक ठरला आहे. यात पत्नी, मुले आणि आई यांनी महेंद्र वाळुंज यांना खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. विशेष म्हणजे हा देखावा भारतीय जवानांना समर्पित करण्यात आला आहे.आजच्या पिढीला पहलगामसारख्या हल्ल्यांची भीषणता आणि त्याला उत्तर देणाऱ्या जवानांचे शौर्य जवळून दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यातुन साकार केला गेला आहे. बाप्पाच्या दरबारात भक्तीबरोबरच देशभक्तीची जाज्वल्य भावना जागृत व्हावी, समाजाने जवानांविषयी कृतज्ञता बाळगावी आणि तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हा यामागचा वाळुंज कुटुंबाचा उद्देश आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी...
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
September 02, 2025 7:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Operation Sindoor Decoration : लाडक्या बाप्पाजवळ साकारला 'ऑपरेशन सिंदूर'चा अनोखा देखावा, डेकोरेशनने वेधलं लक्ष


