Anmol Bishnoi Detained : मोठी बातमी! बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई ताब्यात
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Anmol Bishnoi Detained : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अनमोल बिष्णोई याला अमेरिकेत एफबीआयने ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अनमोल बिष्णोई याला अमेरिकेत एफबीआयने ताब्यात घेतले आहे. अनमोल हा कुख्यात गँगस्टर लाँरेन्स बिष्णोई याचा भाऊ आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिष्णाई याला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतले. त्यानंतर अमेरिकन यंत्रणांनी भारतीय यंत्रणांना याची माहिती दिली आहे.
सध्या, एफबीआय आणि भारतीय तपास यंत्रणांमध्ये प्रत्यार्पणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता अनमोलला येत्या काही दिवसांत भारतात आणले जाऊ शकते.
अनमोलने अमेरिकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश केला असल्याचेही अमेरिकन यंत्रणांना आढळून आले आहे. अनमोल 15 मे 2022 रोजी भानूच्या नावाने बनावट पासपोर्ट बनवून अमेरिकेला पळून गेला. परंतु यूएस इमिग्रेशन विभागाला त्याच्या प्रवासाच्या कागदपत्रांसह जोडलेले एका कंपनीचे संदर्भ पत्र बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला असल्याची माहिती सूत्रांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिली.
advertisement
अनमोल बिष्णोईला याला गुरुवारीच ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून चर्चा केली. भारतीय अधिकारी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये सुमारे 45 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत अनमोल बिष्णोईवरील आरोप, पुरावे आणि इतर बाबींवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनमोल बिष्णोईवर 10 लाखांचे बक्षीस....
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अनमोल बिष्णोई याच्यावर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसावाला याच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. मुसावाला याची मे 2022 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अटकेच्या आठ महिन्यानंतर अनमोल बिष्णोईची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून पलायन केले.
view commentsLocation :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
November 19, 2024 7:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Anmol Bishnoi Detained : मोठी बातमी! बाबा सिद्दिकी प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई ताब्यात


