GATE 2026: गेट परिक्षेच्या नोंदणी प्रक्रियेच्या शेवटची तारीख पुन्हा बदलली; कधीपर्यंत करता येणार अर्ज ?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
GATE 2026 Registration Last Date: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटीकडून 28 ऑगस्टपासून सुरू झालेल्या गेट परिक्षेच्या नोंदणीची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. पूर्वी 6 ऑक्टोबरपर्यंत परिक्षेच्या नोंदणीची अखेरची तारीख होती, आता या तारखेत बदल करण्यात आला आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटीने GATE 2026 परीक्षेच्या नोंदणीसंबधित शेवटच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. 28 ऑगस्टपासून सुरू झालेल्या गेट परिक्षेच्या नोंदणीची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. पूर्वी 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत परिक्षेच्या नोंदणीची अखेरची तारीख होती, आता तिच तारीख 9 ऑक्टोबर 2025 करण्यात आली आहे. अनेक उमेदवारांच्या सोयीच्या दृष्टीने गुवाहाटीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व्यवस्थापकांनी निर्णय घेतला आहे.
गुवाहटी आयआयटीमध्ये जर तुम्हाला तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचे असेल, तर 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत gate2026.iitg.ac.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली असून महिला आणि आरक्षित प्रवर्गांसाठी प्रति पेपर 1500 रुपये तर इतर उमेदवारांसाठी प्रति पेपर 2500 रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. गुवाहटी आयआयटीने अर्जदारांच्या अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक अर्जदारांना अर्ज भरण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला आहे.
advertisement
ज्या उमेदवारांना विविध कारणांमुळे वेळेत अर्ज करणे शक्य झाले नव्हते, त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. IIT गुवाहाटीने यापूर्वी GATE 2026 अर्जाची अंतिम तारीख 28 सप्टेंबर निश्चित केली होती. त्यानंतर 6 ऑक्टोबर करण्यात आली होती, पण आता पुन्हा एकदा शेवटच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. 9 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असेल. https://goaps.iitg.ac.in/login या वेबसाईट वर जाऊन इच्छूक विद्यार्थ्यांनी गेटच्या परिक्षेसाठी अर्ज भरायचा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना गुवाहटीच्या आयआयटीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 05, 2025 4:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
GATE 2026: गेट परिक्षेच्या नोंदणी प्रक्रियेच्या शेवटची तारीख पुन्हा बदलली; कधीपर्यंत करता येणार अर्ज ?