डॉक्टर गौरी गर्जे प्रकरणात नवा ट्विस्ट, अनंतच्या शरीरावर आढळल्या जखमा, कोर्टातून मोठी अपडेट समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे गर्जे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांनी मुंबईच्या वरळी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी पती अनंत गर्जे याच्यासह दीर आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला असून अनंत गर्जेला अटकही केली आहे.
अनंत गर्जेच्या अटकेनंतर आता नवनवी माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, पतीचं अफेअर आणि सातत्याने होणाऱ्या वादाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत गौरी गर्जे आणि अनंत गर्जे दोघांच्याही शरीरावर जखमा आढळल्या आहेत. यामुळे गौरीचा मृत्यू होण्याआधी अनंत आणि गौरीमध्ये झटापट झाली होती का? असा संशय व्यक्त होत आहे.
advertisement
याशिवाय घटनेपूर्वी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही पोलिसांच्या हाती लागले असून त्याची सखोल तपासणी पोलीस करत आहेत. या तपासणीअंत गौरीने आत्महत्या की हत्या? हे स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात. आरोपी अनंत गर्जे याची गुरुवारी पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्याला वरळी येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. याठिकाणी पोलिसांनी तपासातील ही खळबळजनक माहिती दिली. यानंतर आरोपीला अधिकच्या तपासासाठी दोन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे.
advertisement
अनंत गर्जे आणि गौरी गर्जे दोघांच्याही शरीरावर जखमा आढळल्याने या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या अनंतच्या दोघा भावंडांचा शोध सुरू आहे. अद्याप त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्या दोघांना अटक करण्यासाठी अनंत गर्जेची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. त्यानंतर अनंतची पोलीस कोठडी वाढवली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 28, 2025 6:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉक्टर गौरी गर्जे प्रकरणात नवा ट्विस्ट, अनंतच्या शरीरावर आढळल्या जखमा, कोर्टातून मोठी अपडेट समोर


