मोठी बातमी! घाटकोपरच्या भाजप आमदाराचा मुजोरपणा,वृद्ध रिक्षाचालकाला मारहाण; Video पाहून येईल संताप
- Published by:Prachi Amale
Last Updated:
संतप्त झालेल्या भाजप आमदाराने काही ऐकून न घेता थेट वृद्ध रिक्षा चालकाला कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.
राजेश शिंदे, प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपर येथे भाजपचे आमदार पराग शहा यांनी एका रिक्षा चालकाला कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार पराग शहा रिक्षा चालकाला कानशिलात मारताना तसेच त्याला शिवीगाळ करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर, फुटपाथवर बेकायदेशीरपणे दुकाने थाटणाऱ्या दुकानदारांवर तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आमदार पराग शहा यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनादरम्यान परिसरात मोठी गर्दी जमली होती. याच वेळी संबंधित रिक्षा चालक हा विरुद्ध दिशेने रिक्षा चालवत असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार पराग शहा यांनी थेट रिक्षा चालकाला कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला.
advertisement
लोकप्रतिनिधींनी थेट मारहाण करणे कितपत योग्य?
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी कायदा सर्वांसाठी समान आहे, मग एखाद्या आमदाराला कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस, वाहतूक विभाग आणि महानगरपालिका प्रशासन अस्तित्वात असताना लोकप्रतिनिधींनी थेट मारहाण करणे कितपत योग्य आहे, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
advertisement
नागरिकांमध्ये संताप
दरम्यान, काही समर्थकांकडून आमदार पराग शहा यांच्या कृतीचे समर्थन केले जात असून, घाटकोपर परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि बेकायदेशीर अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होणे अपेक्षित असताना थेट हात उचलणे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
advertisement
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या प्रकरणी संबंधित रिक्षा चालकाकडून तक्रार दाखल होते का? पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, तसेच भाजप पक्षाकडून आमदार पराग शहा यांच्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हायरल व्हिडीओमुळे ही घटना केवळ घाटकोपरपुरती मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही अद्याप आमदार पराग शहा यांनी कोणतेही स्पष्टीकरण किंवा त्यांची बाजू समोर आलेली नाही.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 3:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! घाटकोपरच्या भाजप आमदाराचा मुजोरपणा,वृद्ध रिक्षाचालकाला मारहाण; Video पाहून येईल संताप









