गोकुळमधील भानगडी थांबवून मंत्री मुश्रीफांनी लेखी उत्तर द्यावे, कोल्हापूरमध्ये ठाकरे गट आक्रमक
- Published by:Prachi Amale
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
Last Updated:
विविध मार्गाने गोकुळच्या हंडीतील लोणी खाण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठा दूध संध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या काराभाराविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. गोकुळमधल्या भ्रष्टाचाराच्या भानगडी थांबवून मंत्री हलन मुश्रीफांनी लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे. तसेच गोकुळच्या जाजम आणि घड्याळ घोटाळ्यावरून देखील चांगलेच सुनावले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोकुळने दूध उत्पादक संस्थाना घड्याळ आणि जाजम वाटप केले. सुमारे 3 कोटींची ही खरेदी करताना टेंडर न काढता केवळ कोटेशन मागवून घेतले. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. वाटप केलेले घड्याळ आणि जाजम यांची बाजारातील किंमत वेगळी आहे. गोकुळने खरेदी केलेली किंमत वेगळी आहे असा आरोप देखील शिवसेनेनं केला आहे. त्यामुळे ही खरेदी केलेल्या गोकुळचा अधिकाऱ्यावर आणि त्याला मंजुरी देणाऱ्या संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी सेनेच्या वतीने केली आहे.
advertisement
मुश्रीफांनी पुढे येऊन या सर्व भानगडी थांबवाव्यात : संजय पवार
संजय पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे कोणी खात आहे का? हे देखील मुश्रीफांनी पाहणे गरजेचे आहे. जे चांगले काम करतात त्यांची पाठ थोपटा मात्र जे चुकीचे काम करत आहे त्यांना शिक्षा करा. गोकुळचा कारभार चांगला चालला आहे तर मुश्रीफांनी पुढे यायला हवं. पशुखाद्य घोटाळा झाला. त्यामुळे मुश्रीफांनी पुढे येऊन या सर्व भानगडी थांबवाव्यात.
advertisement
गोकुळच्या हंडीतील लोणी खाण्याचा प्रकार, शिवसेनेचा गंभीर आरोप
दूध संस्थाना भेटवस्तू देण्यास आमचा विरोध नाही मात्र ज्या पद्धतीने वस्तूंची खेरदी झाली यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा आहे. दूध उत्पादकांच्या कष्टांच्या पैशांचा दुरुपयोग असून घामाच्या पैशावर डल्ला मारणे योग्य नाही. गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांचा नाही तर राजकीय अड्डा बनत चालला आहे. उत्पादकांच्या पैशातबून कधी घड्याळ खरेदी, पशुखाद्य वाटप, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सहल आदी मार्गाने गोकुळच्या हंडीतील लोणी खाण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 08, 2025 4:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोकुळमधील भानगडी थांबवून मंत्री मुश्रीफांनी लेखी उत्तर द्यावे, कोल्हापूरमध्ये ठाकरे गट आक्रमक