Gondia Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला,ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
गोंदियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांसोबत अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकला मागून दिलल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे.
Gondia Accident News : रवी सपाटे, गोंदिया : गोंदियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांसोबत अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकला मागून दिलल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे.संजय मानकर,आशिष फुने अशी मृतांची नावे आहेत.तर श्यामकुमार भोयर असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सूरू आहेत. राजनांदगाव जिल्ह्यातील छूरीया गावाजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या देवरी तालुक्यातील शिलापूर येथील काही तरूण भावीक दुचाकीवरून छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील बमलेश्वरी मातेच्या दर्शनाला निघाले होते. या दरम्यान त्यांच्या दुचाकीने ट्रकला मागून दिलेल्या धडकेत दोघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता. संजय मानकर,आशिष फुने अशी या मृतांची नावे आहेत. त्याचसोबत या अपघातात एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. श्यामकुमार भोयर असे या जखमीचे नाव आहे. या जखमी व्यक्तीला छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
खरं तर छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील बमलेश्वरी मातेच्या दर्शनाला तीन तरूण एकाच दुचाकीवर निघाले होते. या दरम्यान राजनांदगाव जिल्ह्यातील छूरीया गावाजवळ या दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर या अपघातात एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेने शिलापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
October 01, 2025 6:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gondia Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला,ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर