Gondia News : महावितरणचा हलगर्जीपणा पती-पत्नीच्या जीवावर; गोंदियातील घटनेने हळहळ

Last Updated:

Gondia News : विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पती–पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

महावितरणचा हलगर्जीपणा
महावितरणचा हलगर्जीपणा
गोंदिया, 20 सप्टेंबर (रवी सपाटे, प्रतिनिधी) : महावितरण विभागाच्या कारभाराचे ग्रामीण भागात नेहमीच चटके बसतात. मात्र, यावेळी एका निष्पाप दाम्पत्याने आपला जीव गमावला आहे. शेत शिवारात विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पती–पत्नीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम घाटबोरी/कोहळी येथे ही घटना घडली. एकाच वेळी नवरा बायकोचा जीव गेल्याने पंचक्रोशित हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे घटना?
ग्राम कोदामेडी ते शिंदिपार मार्गावरील आपल्या शेतात भात पिकाचे निंदण करण्यासाठी दोन भाऊ व त्यांची पत्नी असे चार लोक शेतात जात होते. याचवेळी शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी तुळशीदास रेवाराम लंजे (वय 45 वर्षे), त्यांची पत्नी मायाबाई तुळशीदास लंजे (वय वर्ष 42 वर्षे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इंदुबाई हिरालाल लंजे (वय 43 वर्षे) या जखमी झाल्या आहेत. त्यांचे पती सुधा घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या लक्ष्यात आले की इथे विद्युत पुरवठा चालू आहे. त्यामुळे त्यांनी विद्युत तारेला लाकडी काठीने लांब फेकले. त्यामुळे इंदुबाई हिरालाल लंजे यांचे प्राण वाचवले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. लंजे यांच्या शेतातून विद्युत विभागाचे 33 एल. टी. ची लाईन गेली आहे. पाऊस व वाऱ्याने सदर लाईनची तार मागील 5 ते 6 दिवसापासून तुटून पडली होती. याची माहिती काही शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला दिली होती. मात्र, विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकऱ्याला आपले जीव गमवावे लागले आहे.
advertisement
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
महावितरणच्या गलथान कारभारामुळे यापूर्वी अनेक हकनाक बळी गेले आहेत. तरीही प्रशासनाचे डोळे उघडल्याचे दिसत नाही. आज या घटनेत पतीपत्नीचा मृत्यू झाला आहे. जर वेळीच विजेच्या तारा दुरुस्त केल्या असत्या तर हे जीव नक्कीच वाचले असते. या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे.
advertisement
यापूर्वीही अशाच घटनेत चोघांचा मृत्यू
तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील गिरधारी साठवणे यांचे विहिरीत असलेली मोटार पाण्याने बुडून जाण्याची शक्यता असल्यामुळे ही मोटर काढण्याकरता त्यांचा मुलगा खेमराज गिरधारी साठवणे (वय 50), प्रकाश भोगाडे (वय 50), सचिन यशवंत भोंगाडे (वय 30), महेंद्र राऊत (वय 28) वर्षे हे विहिरीत उतरले असता त्यांना विजेचा धक्का लागून एकावर एक खाली पडून चौघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक दुर्दैवी घटना घडली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia News : महावितरणचा हलगर्जीपणा पती-पत्नीच्या जीवावर; गोंदियातील घटनेने हळहळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement