12 तासांपासून बेपत्ता अन् निर्जनस्थळी आढळली कार, GST अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, बीड हादरलं
- Published by:Sachin S
Last Updated:
सचिन जाधव हे शुक्रवारपासून बेपत्ता होते. सगळीकडे त्यांचा शोध घेण्यात आला पण ते कुठेही आढळले नाही.
बीड : बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये काही केल्या कमी होत नाही. राज्यभरात एकीकडे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली. शहरात एका जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या अधिकाऱ्याचा मृतदेह हा सोलापूर- धुळे महामार्ग नजीक कारमध्ये आढळला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड येथे राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. सचिन जाधव असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. सचिन जाधव हे शुक्रवारपासून बेपत्ता होते. सगळीकडे त्यांचा शोध घेण्यात आला पण ते कुठेही आढळले नाही. नातेवाईक, मित्र परिवार आणि कार्यालयातही पाहिलं, पण सचिन जाधव यांचा कुठेही पत्ता लागला नाही.
advertisement
अखेरीस, सचिन जाधव यांच्या पत्नीने बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांंनी तक्रारीची नोंद घेत सगळीकडे शोध सुरू केला. पण, शुक्रवारी रात्रीपर्यंत कुठेही पत्ता लागला नाही.
सोलापूर-धुळे महामार्गालगत आढळला मृतदेह
दरम्यान, अचानक आज शनिवारी दुपारी सचिन जाधव यांची कार सोलापूर - धुळे महामार्गालगत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधवर हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सचिन जाधव यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. या ठिकाणी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. या प्रकरणात अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 5:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
12 तासांपासून बेपत्ता अन् निर्जनस्थळी आढळली कार, GST अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, बीड हादरलं









