जिथे अटक व्हायची, त्याच पोलीस स्टेशनचे उद्घाटन गुलाबराव पाटलांनी केले! जुन्या किश्श्यांनी भाषणात रंगत

Last Updated:

Gulabrao Patil: ज्या पोलीस स्टेशनात अटक व्हायची, त्याच पोलीस स्थानकाचे उद्घाटन करण्याचे नशीब मला लाभले, अशी फटकेबाजी गुलाबराव पाटील यांनी केली.

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील
जळगाव : आंदोलने करताना अटक होणाऱ्या पोलीस स्टेशनाच्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी आज पालकमंत्री म्हणून माझ्यावर आली याच्यासारखा आनंदाचा दिवस दुसरा नाहीये, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या उद्घाटनपर भाषणात त्यांची जोरदार फटकेबाजी केली.
जळगावच्या पाळधी पोलीस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात आपल्या राजकीय प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला.
पूर्वी आंदोलने करताना जिथे अटक व्हायची, त्याच पोलीस स्टेशनची इमारत बांधण्याची जबाबदारी आज माझ्यावर आली आहे. याच्यासारखा दुसरा आनंद नाही. शिवसेनेची शाखा पाळधीमध्ये उघडली तेव्हा वाटले नव्हते की मी कधी मंत्री होईन. गावात टवाळ म्हणून ओळख होती. पण याच गावाने मला मोठे केलं आणि राजकारणात उभे राहायला ताकद दिली, असा विशेष उल्लेख गुलाबराव पाटील यांनी केला. पाळध गावाचे योगदान माझ्या आयुष्यात खूप आहे. आज मी जो काही आहे ते पाळध गावामुळेच... असे उद्गार गुलाबराव पाटील यांनी काढले.
advertisement
याच पोलीसच्या आवारात शिवसेनेची शाखा सुरू झाली. शाखेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. १९८५ साली राजकारणाला सुरुवात केली. तेव्हा माहिती नव्हते की ज्या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार केस झाल्या त्याच पोलीस स्टेशनचे बांधकाम करण्याची जबाबदारी आपल्यावर येईल आणि उद्घाटनही आपल्या हस्ते होईल... सगळीकडे भाषणे करतो पण गावात भाषण करताना जरा अडचण येते. कारण याच गावात लहानाचा मोठा झालो, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिथे अटक व्हायची, त्याच पोलीस स्टेशनचे उद्घाटन गुलाबराव पाटलांनी केले! जुन्या किश्श्यांनी भाषणात रंगत
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement