advertisement

शेतकऱ्यानं जीवन संपवलं; लेकीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र, 'सर देवाचा नंबर द्या..'

Last Updated:

सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे. त्यानंतर या शेतकऱ्याच्या लेकीनं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहीलं आहे.

शेतकऱ्यानं जीवन संपवलं, लेकीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
शेतकऱ्यानं जीवन संपवलं, लेकीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
हिंगोली, 27 ऑक्टोबर, मनीष खरात : जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात एका शेतकऱ्यानं नापीकी व कर्जबाराजीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. नारायण खोडके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. नारायण खोडके यांच्या आत्महत्येमुळं त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं आहे. खोडके यांच्या चिमुकलीनं आपल्या वडिलांच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहीलं आहे. हे पत्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
किरण खोडके असं या मुलीचं नाव आहे. तिने आपल्या बाबांना परत बोलवण्यासाठी देवाघरचा नंबर देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. 'सर, तुमचा दसरा चांगला गेला, तुमची दिवाळी पण चांगली जाणार. आमच्या घरी दसरा नाही, दिवाळी नाही. आई रडत असते.
सारखी म्हणते मालाला भाव असते तर तुझा बाबा मेला नसता. वावरात सोयाबीन कमी झालं. आई न बाबाचं भांडण झालं, आणि आमचा बाबा पुन्हा आला नाही. आजीला विचारलं तर ती म्हणते देवाघरी गेला. सर देवाचं घर कुठं आहे. त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबांना पाठवा लवकर, दिवाळी येणार आहे, आमच्या घरी दोन दीदी मी आणि दादा आहोत, रोज बाबाची वाट पाहतो, पण ते येत नाहीत. मग आम्हाला दिवाळीला बाजारात कोण नेईल, कपडे कोण घेईलं?' असं या चिमुकलीनं आपल्या पात्रात म्हटलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
शेतकऱ्यानं जीवन संपवलं; लेकीचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र, 'सर देवाचा नंबर द्या..'
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement