बायको आणि लेकीच्या मृतदेहावर डोकं ठेवून दिलीप फक्त रडत होते, बुलडाण्यातली हृदयद्रावक घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
ट्रकची जेव्हा धडक बसली तेव्हा शीतल बोंबाटकर आणि मुलगी श्रावणी ही खाली फेकले गेले आणि ट्रकच्या चाकाखाली सापडले.
राहुल खंडारे, प्रतिनिधी
खामगाव: बुलडाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खामगाव–नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या भीषण अपघातात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात कुटुंबातील वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना खामगाव–नांदुरा रोडवरील आमसरी फाट्याजवळ घडली. दिलीप बोंबाटकर (रा. नागपूर) हे आपल्या पत्नी शीतल बोंबाटकर आणि मुलगी श्रावणी यांच्यासह मोटारसायकल क्रमांक एम.एच. २८ ए.एच. १५६५ वरून नांदुरा तालुक्यातील नागापूर इथं जात होते. आमसरी फाट्याजवळ अचानक भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
advertisement
मायलेकीचा जागीच मृत्यू
धडक इतकी भीषण होती की, शीतल बोंबाटकर आणि मुलगी श्रावणी यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकची जेव्हा धडक बसली तेव्हा शीतल बोंबाटकर आणि मुलगी श्रावणी ही खाली फेकले गेले आणि ट्रकच्या चाकाखाली सापडले. त्यामुळे मायलेकीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळावरचं दृश्य हे भयानक होतं. ट्रकने काही अंतर दुचाकीला फरफटत नेलं होतं. त्यामुळे मृतदेहांची अवस्था भीषण अशी झाली होती. रस्त्यावर काही अंतरापर्यंत मांसाचे तुकडे हे चिटकलेले होते. तर या अपघातात दिलीप बोंबाटकर गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर नांदुरा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.
advertisement
घटना घडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली आणि दिलीप बोंबाटकर यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रस्त्याच्या बाजूला दिलीप बोंबाटकर हे बायको आणि लेकीचा मृतदेहावर डोक ठेवून रडत होते. हे दृश्य पाहून उपस्थितीत लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दिलीप बोंबाटकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.
ट्रकचालक फरार
view commentsअपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तसंच अज्ञात ट्रक आणि चालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Dec 18, 2025 10:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बायको आणि लेकीच्या मृतदेहावर डोकं ठेवून दिलीप फक्त रडत होते, बुलडाण्यातली हृदयद्रावक घटना











