Manoj Jarange : 'भाजपने भुजबळांना ऑफर दिली?', मनोज जरांगे पाटलांना संशय

Last Updated:

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि भाजपवर निशाणा साधला आहे. भुजबळांना भाजपकडून काही ऑफर असावी, असा संशयही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

भुजबळांना भाजपची ऑफर? मनोज जरांगे पाटलांना संशय
भुजबळांना भाजपची ऑफर? मनोज जरांगे पाटलांना संशय
हरीष दिमोटे, प्रतिनिधी
अहमदनगर, 23 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि भाजपवर निशाणा साधला आहे. आमचे बोर्ड फाडले म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी सोडणार आहे का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसंच भुजबळांना भाजपकडून काही ऑफर आली असावी, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली आहे.
advertisement
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काही बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांना काय ऑफर दिलीय का? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी विचारला. आजपर्यंत यांनी अनेकदा इकडून तिकडे पलट्या मारल्या आहेत, त्यामुळे त्यांना फुस लावून त्रास देण्याचं काम सुरू असल्याचा घणाघाती आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी आपल्या शिक्षण संस्थेला फुलेंचं नाव दिलं का? तुमचं प्रेम बेगडी आहे, कोणता आदर्श तुम्ही घेतलाय. जातीय तेढ निर्माण करण्याचा आदर्श तुम्ही घेतला आहे का? असा निशाणा जरांगे पाटील यांनी भुजबळांवर साधला आहे.
advertisement
'आमचे बोर्ड फाडले, अजितदादा त्याला समज द्या, अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बोर्ड फाडले तर वेगळा विचार करावा लागेल. आम्हाला उचकवू नका, अन्यथा मराठे समर्थ आहेत. याने चिल्लर चाळे थांबवले नाहीत, तर सरकारला जड जाईल,' असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
advertisement
'हा ज्या पक्षात जातो त्या पक्षाची वाट लावतो. सरकारने याला शांत केले नाही, तर सकार डॅमेज होईल. फडणवीस यांनी त्याला समज द्यावी, अन्यथा मराठे तुमच्यादेखील चाव्या काढून घेतील. एकदा पदरात आरक्षण मिळू द्या, मग याच्याकडे बघू. तो अंबडमध्ये येऊन खूप काही बोलून गेलाय, आरक्षण जवळ आलंय, म्हणून संयम धरलाय, अन्यथा टप्प्यात कार्यक्रम केला असता. त्याच्यात किती खुमखुमी आहे, बघूया,' अशी टीकाही जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केली आहे.
advertisement
'मला पाचवी शिकलेला म्हणतो, जेलमध्ये जाऊन आला, तुझा अभ्यास काय कामाचा? अनेक वर्ष आमचं आरक्षण खाल्लं, त्याची खायची हाव संपेना. आज चुकून छगन भुजबळ हे नाव घेतलं. राज्याची शांतता बिघडवण्याचं काम तो करतोय, हा माणूस जातीय तेढ निर्माण करतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांना समज द्यावी, अन्यथा आम्ही सज्ज झालोय. भुजबळांना सरकारचं पाठबळ आहे का?' असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange : 'भाजपने भुजबळांना ऑफर दिली?', मनोज जरांगे पाटलांना संशय
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement