NCP : अजितदादांची अचानक भेट का घेतली? स्वत: अमोल कोल्हेंनीच सांगितली Inside Story
- Published by:Shreyas
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.
मुंबई, 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. अजित पवार यांची भेट विकासकामांच्या निमित्ताने घेतल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
'अजित पवार हे वित्त व नियोजन मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेली अनेक वर्ष पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडीसिटी हे प्रकल्प फक्त शिरुर मतदारसंघासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी पथदर्शी प्रकल्प आहे. यासाठी अजितदादांनी आधीही आग्रही भूमिका घेतली होती, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि इतरही विकासकामांची मागणी करण्यासाठी ही भेट झाली', असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
advertisement
'जी राजकीय भूमिका आहे ती राजकीय भूमिका आहे. विकासकामांसाठी भेटलो होतो, त्यामुळे राजकीय भाष्य करणं उचित ठरणार नाही. 24 तास राजकारणाचा विचार करण्यापेक्षा 24 तास विकासाचा विचार करू, राजकारणाचा विचार निवडणुकांनंतर करूया', असं सूचक विधानही अमोल कोल्हे यांनी केलं.
advertisement
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा या शपथविधी सोहळ्याला अमोल कोल्हेही उपस्थित होते, त्यामुळे अमोल कोल्हेही अजित पवारांसोबत गेल्याचं दिसत होतं, पण काही तासांमध्येच अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचं स्पष्ट केलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 23, 2023 3:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP : अजितदादांची अचानक भेट का घेतली? स्वत: अमोल कोल्हेंनीच सांगितली Inside Story









