एकनाथ शिंदे आणि ओवैसींना धक्का, काँग्रेसचा डाव, इस्लाम पार्टी सत्तास्थापन करणार

Last Updated:

इस्लाम पक्षाने मालेगाव महापालिका निवडणुकीत ३५ जागांवर विजय मिळवला आहे.

मालेगाव महापालिका
मालेगाव महापालिका
मालेगाव : मालेगाव महापालिका सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे. कोणत्याच एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापन कोण करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले. अखेर काँग्रेस पक्षाने इस्लाम पक्षाला पाठिंबा देत महापालिकेच्या सत्ता स्थापनेची कोंडी फोडली आहे. सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे आणि एमआयएम प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
इस्लाम पक्षाने मालेगाव महापालिका निवडणुकीत ३५ जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएम २१, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे १८, समाजवादी पक्ष ६, काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इस्लाम पक्षाला आठ नगरसेवकांची गरज होती.
अशावेळी इस्लामचा सहयोगी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे ५ नगरसेवक आणि काँग्रेसने पाठिंबा दिल्याने सत्तास्थापनेचा पेच सुटलेला आहे. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांच्या पाठिंब्याने तिन्ही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या ४३ एवढी झाली आहे. दरम्यान, इस्लाम पार्टीच्या शिष्ट मंडळाने एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेऊन पाठिंब्यासाठी चर्चा केली. साधक बाधक चर्चेअंती काँग्रेसने इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले.
advertisement

एकनाथ शिंदे आणि ओवैसींना धक्का

मालेगाव महापालिकेमध्ये महापौर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक प्रस्ताव स्थानिक नेत्यांना आला होता पण आम्ही नकार दिला, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले. याचाच अर्थ सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना एमआयएम पक्षाशी हातमिळवणी करण्यासाठी तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, सत्तास्थापनेची तयारी करणाऱ्या दोन्ही पक्षांना इस्लाम पार्टी आणि काँग्रेसने धक्का दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदे आणि ओवैसींना धक्का, काँग्रेसचा डाव, इस्लाम पार्टी सत्तास्थापन करणार
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement