स्वस्त Home Loan मिळवण्याची सर्वात मोठी 'Secret' ट्रिक; बँक स्वतःहून कमी करेल व्याजदर, वाचा लाखो कसे वाचवायचे!

Last Updated:

Cheapest Home Loan Trick: होम लोन स्वस्त मिळवण्यासाठी केवळ घराची किंमत नाही, तर तुमचा 800 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोर सर्वात मोठी भूमिका बजावतो. क्रेडिट कार्डचा मर्यादित वापर आणि जुन्या खात्यांची शिस्त पाळल्यास तुम्ही बँकेकडून सर्वात कमी व्याजदर मिळवून लाखो रुपयांची बचत करू शकता.

News18
News18
घर खरेदी करताना आपण सहसा घराची किंमत, डाऊन पेमेंट आणि EMI यांचाच विचार करतो. पण बँका सर्वात आधी तुमचा 'क्रेडिट स्कोर' (Credit Score) पाहतात. जर तुमचा स्कोर 800 च्या वर असेल, तर तुम्हाला सर्वात स्वस्त दरात गृहकर्ज मिळू शकते.
क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी आणि स्वस्त गृहकर्ज मिळवण्यासाठी या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स (Cheapest Home Loan Trick):
1. 800+ क्रेडिट स्कोर असण्याचे मोठे फायदे
बँकांसाठी 800 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोर असलेला ग्राहक हा 'अतिशय विश्वासार्ह' असतो. अशा ग्राहकांना बँका खालील फायदे देतात:
कमी व्याजदर: अनेक बँका अशा ग्राहकांसाठी व्याजाचा दर (Interest Rate) कमी ठेवतात. गृहकर्जासारख्या मोठ्या कर्जामध्ये व्याजदरात झालेली 0.05% किंवा 0.1% ची घटही लाखांची बचत करू शकते.
advertisement
जलद मंजुरी: तुमचा व्यवहार चोख असल्याने बँक जास्त चौकशी न करता कर्ज लवकर मंजूर (Quick Approval) करते.
बार्गेनिंग पॉवर: 800+ स्कोर असल्यावर तुम्ही बँकेशी व्याजाच्या दराबाबत घासाघीस किंवा 'नेगोशिएशन' करू शकता.
2. स्कोर 750-780 वर का अडकतो? (क्रेडिट कार्डचा वापर)
अनेक पगारदार लोकांचा हप्ता कधीच चुकत नाही, तरीही त्यांचा स्कोर 800 पर्यंत पोहोचत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे 'क्रेडिट युटिलायझेशन रेशो'.
advertisement
चूक: क्रेडिट कार्डच्या मर्यादेचा (Limit) मोठा हिस्सा वापरणे. यामुळे तुम्ही कर्जावर जास्त अवलंबून आहात असे बँकांना वाटते.
उपाय: तुमच्या एकूण मर्यादेच्या केवळ 25% ते 30% हिस्साच वापरावा. जर तुमचा खर्च जास्त असेल, तर बँकेला सांगून कार्डची लिमिट वाढवून घ्या, पण खर्च मात्र मर्यादित ठेवा. यामुळे तुमचा स्कोर वेगाने सुधारेल.
3. जुने क्रेडिट कार्ड बंद करू नका
अनेकजण नवीन कार्ड मिळाले की जुने कार्ड बंद करतात. पण जुने खाते तुमची 'क्रेडिट हिस्ट्री' किती जुनी आणि मजबूत आहे हे दर्शवते.
advertisement
जर कार्डवर कोणतेही वार्षिक शुल्क (Annual Fee) नसेल, तर ते खाते चालू ठेवा. यामुळे बँकेला तुमचा दीर्घकालीन चांगला रेकॉर्ड दिसतो आणि स्कोर वाढण्यास मदत होते.
4. ऑटो-डेबिट आणि शिस्त
800 च्या जवळ पोहोचल्यानंतर एक छोटीशी चूकही महागात पडू शकते.
एखाद्या सबस्क्रिप्शनचे पेमेंट चुकणे किंवा हप्ता भरण्यास एका दिवसाचा उशीर होणे यामुळे स्कोर झटक्यात खाली येतो.
advertisement
यासाठी 'ऑटो-डेबिट' (Auto-debit) किंवा रिमांडर सेट करा, जेणेकरून शिस्त कायम राहील.
5. घर घेण्यापूर्वी नवीन कर्ज किंवा कार्ड टाळा
होम लोनसाठी अर्ज करण्याच्या किमान 6 महिने आधी कोणत्याही नवीन क्रेडिट कार्डसाठी किंवा वैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) अर्ज करू नका. वारंवार चौकशी केल्यामुळे तुमचा स्कोर तात्पुरता कमी होतो आणि तुम्ही 'क्रेडिट हंगेरी' (कर्जासाठी उत्सुक) आहात असा संदेश बँकेला जातो.
advertisement
6. क्रेडिट रिपोर्टची नियमित तपासणी
कधीकधी तांत्रिक चुकांमुळे तुमच्या रिपोर्टमध्ये चुकीच्या नोंदी (Wrong Entry) होतात. त्यामुळे वर्षातून किमान दोनदा तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा आणि काही चूक आढळल्यास ती लगेच दुरुस्त करून घ्या.
view comments
मराठी बातम्या/मनी/
स्वस्त Home Loan मिळवण्याची सर्वात मोठी 'Secret' ट्रिक; बँक स्वतःहून कमी करेल व्याजदर, वाचा लाखो कसे वाचवायचे!
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement