चोपडा नगरपरिषदेत 'महिलाराज' असणार, १५ प्रभागात १६ महिलांना संधी, दिग्गजांना नवीन प्रभाग शोधण्याची वेळ

Last Updated:

Chopda Nagar Parishad: चोपडा नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर, 15 प्रभागात 16 महिलांना संधी, काही नगरसेवकांना नवीन प्रभाग शोधण्याची वेळ.

चोपडा नगर परिषद
चोपडा नगर परिषद
जळगाव: चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाच्या नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी महिला राखीव झाल्यानंतर आज नगरपरिषदेच्या १५ प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. नगरपरिषदेच्या १५ प्रभागात १६ महिलांना संधी मिळाल्याने दिग्गजांना नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.
आरक्षण सोडत नगरपरिषदेच्या नाट्यगृहात येथे अनुसूचित जाती-जमाती नागरिकांच्या मागासवर्ग महिलांसाठी आणि सर्वसाधारणसाठी आरक्षण सोडत प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडतीसाठी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अंमळनेर नितीन मुंडावरे, सहाय्यक पीठासन अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर आरक्षणाची सोडत अनुभविण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
advertisement
नगरपरिषदेच्या पंधरा प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. ३१ जागांपैकी १६ जागांवर महिलांचे आरक्षण निघाले. तर १५ जागांवर पुरुषांना संधी मिळणार आहे. महिलांचे आरक्षण याप्रमाणे सर्वसाधारण महिला दहा जागा, ओबीसी महिलांसाठी चार जागा, एसटी महिलेसाठी एक आणि एससी महिलांसाठी एक असे आरक्षण सोडत काढण्यात आली. ज्या नागरिकांना आरक्षण सोडत संदर्भात हरकत घ्यायची असेल त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकत घेऊ शकता, असे पीठासन अधिकारी नितीन मुंडावरे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चोपडा नगरपरिषदेत 'महिलाराज' असणार, १५ प्रभागात १६ महिलांना संधी, दिग्गजांना नवीन प्रभाग शोधण्याची वेळ
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement