advertisement

दोन दिवसांपासून बेपत्ता, मासेमारी करणाऱ्याला नदीत दिसला, जीभ छाटलेली, जळगावात युवकाचा घातपात?

Last Updated:

जळगाव शहरातील तांबापुरा, बिलाल चौक परिसरातील शेख अबुजर शेख युनूस या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह तलावात आढळून आला.

जळगावातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला
जळगावातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह मेहरुन तलावात आढळल्यानंतर खळबळ उडाली. मृतदेहाची जीभ कापलेली असल्याचा संशय व्यक्त करत जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली.
जळगाव शहरातील तांबापुरा, बिलाल चौक परिसरातील शेख अबुजर शेख युनूस या २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह तलावात आढळून आला. परंतु अबूजरच्या मृतदेहाची जीभ कापलेली असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

मासेमारी करणाऱ्याला मृतदेह तरंगताना दिसला

अबुजर दोन दिवसांपासून घरातून निघालेला होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. मेहरुन तलावात मासेमारी करत असताना एका व्यक्तीला तलावात मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी पोहोचत त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
advertisement

जीभ कापलेली असल्याचा कुटुंबियांना संशय

अबुजर याने अंगात घरातून बाहेर पडताना घातलेले कपडे होते आणि खिशात मोबाईल सापडला. मात्र जीभ कापलेली असल्याचा संशय व्यक्त करत हा घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आला असून, कुटुंबीयांनी सखोल तपासाची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन दिवसांपासून बेपत्ता, मासेमारी करणाऱ्याला नदीत दिसला, जीभ छाटलेली, जळगावात युवकाचा घातपात?
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement