advertisement

'पाकिस्तानमध्ये जाऊ नका...', परदेशी खेळाडूंना सरकारचं फर्मान, PSL बंद करण्याची वेळ?

Last Updated:

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परदेशी खेळाडू आधीच पीएसएल सोडत असल्याचं समोर आलं आहे, त्यातच आता पाकिस्तान सुपर लीगवर नवीन संकट ओढावलं आहे.

'पाकिस्तानमध्ये जाऊ नका...', परदेशी खेळाडूंना सरकारचं फर्मान, PSL बंद करण्याची वेळ?
'पाकिस्तानमध्ये जाऊ नका...', परदेशी खेळाडूंना सरकारचं फर्मान, PSL बंद करण्याची वेळ?
मुंबई : आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परदेशी खेळाडू आधीच पीएसएल सोडत असल्याचं समोर आलं आहे, त्यातच आता पाकिस्तान सुपर लीगवर नवीन संकट ओढावलं आहे. पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे काबूलमध्ये 400 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे पाकिस्तान सुपर लीगचं भवितव्यच धोक्यात आलं आहे. त्यातच इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे प्रवासात व्यत्यय आला आहे, त्यामुळेही पीएसएलच्या समस्या वाढल्या आहेत. या परिस्थितीमध्ये परदेशी खेळाडू पीएसएलमध्ये सहभागी होतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासोबतच अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू 2026 च्या पीएसएलमध्ये खेळणार आहेत. पीएसएलला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. टीम पेन आणि जेसन गिलेस्पी हे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू पीएसएलमध्ये कोच आहेत.

पेशावरपासून लांब राहा

ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या खेळाडूंना पाकिस्तानला जायला परवानगी तर दिली आहे, पण त्यांना पेशावरपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे, ऑस्ट्रेलियातील 'कोड स्पोर्ट्स' ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या संघर्षामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने पेशावरमध्ये प्रवास करू नका, असं खेळाडूंना सांगितलं आहे. पीएसएलचे सामने पेशावरमध्ये होणार आहेत.
advertisement
28 मार्चला पेशावरच्या इम्रान खान स्टेडियमवर पेशावर झल्मी आणि रावळपिंडीझ यांच्यातील सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन हार्डी पेशावर झल्मीमध्ये तर जेक फ्रेझर-मॅकगर्क पिंडीझ टीममध्ये आहेत. गरज पडली तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खासगी विमानांमधून पाकिस्तानबाहेर काढलं जाईल, असं आश्वासन देण्यात आल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

अफगाणिस्तानच्या खेळाडूंची माघार

दरम्यान पाकिस्तान सुपर लीगच्या 11व्या मोसमासाठी झालेल्या लिलावातून अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी त्यांची नावे मागे घेतली आहेत. मुजीब उर रहमान, सैद्दिकुल्ला अटल, मोहम्मद नबी, वकार सलामखिल आणि फजल हक फारुकी या खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. पेशावर झल्मीने अफगाणिस्तानचा ओपनर रहमानुल्ला गुरबाजला थेट करारबद्ध केल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली, त्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी त्यांची नावं मागे घेतली.
advertisement
पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) ११ व्या हंगामापूर्वी आयोजित केलेल्या पहिल्या खेळाडूंच्या लिलावातून अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. एका फ्रँचायझी मालकाने सुरुवातीला पुष्टी केली होती की, मुजीब उर रहमान, सेद्दिकुल्ला अटल, मोहम्मद नबी, वकार सलामखिल आणि फजल हक फारुकी यांसारख्या खेळाडूंनी बुधवारी लाहोरमध्ये झालेल्या लिलावासाठी नोंदणी केली होती. पण पेशावर झल्मीने अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्ला गुरबाजला थेट करारबद्ध केल्यावर झालेल्या टीकेनंतर त्यांनी आपली नावे मागे घेतली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'पाकिस्तानमध्ये जाऊ नका...', परदेशी खेळाडूंना सरकारचं फर्मान, PSL बंद करण्याची वेळ?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement