Jalgaon : जळगावात केळीच्या बागेत भयानक कांड, पोलिसांना टिप मिळाली, दृश्य पाहून पायाखालची जमीन सरकली!

Last Updated:

सोन्याची राजधानी असलेलं जळगाव हे तिथल्या केळींच्या उत्पादनामुळेही जगभरात प्रसिद्ध आहे, पण याच जळगावमध्ये केळीच्या शेतात घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ माजली आहे.

जळगावात केळीच्या बागेत भयानक कांड, पोलिसांना टिप मिळाली, दृश्य पाहून पायाखालची जमीन सरकली! (AI Image)
जळगावात केळीच्या बागेत भयानक कांड, पोलिसांना टिप मिळाली, दृश्य पाहून पायाखालची जमीन सरकली! (AI Image)
जळगाव : सोन्याची राजधानी असलेलं जळगाव हे तिथल्या केळींच्या उत्पादनामुळेही जगभरात प्रसिद्ध आहे, पण याच जळगावमध्ये केळीच्या शेतात घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ माजली आहे. मुक्ताईनगरच्या माणगावमध्ये केळीच्या शेतामध्ये दिसलेल्या दृश्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. केळीच्या बागेमध्ये अवैधरित्या गांजा पिकाची लागवड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुक्ताईनगर पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माणगावमधल्या शिवारात छापा टाकला, तेव्हा त्यांना केळी बागेच्या आडोश्याला गांजाची शेती मोठ्या प्रमाणावर केली गेल्याचं समजलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गांजाचं पीक नष्ट केलं आहे. तसंच याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
केळी बागेच्या दाट फांद्यांच्या आत नियोजनबद्ध पद्धतीने गांजाची शेती सुरू होती. फांद्यांच्या आतमध्ये काय सुरू आहे, हे ये जा करणाऱ्या कुणालाही कळत नव्हतं, पण आतामध्ये गांजाची झाडे पूर्णपणे वाढलेली होती. गांजाच्या या पीकाचा बाजारभाव लाखोंच्या घरात असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी गांजाची शेती नष्ट केली, तसंच तपास आणि पुरावा म्हणून गांजाच्या झाडाचे नमुने जप्त केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे हे ऑपरेशन पार पाडलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon : जळगावात केळीच्या बागेत भयानक कांड, पोलिसांना टिप मिळाली, दृश्य पाहून पायाखालची जमीन सरकली!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement