फेब्रुवारी सुरू होताच गारपीट अन् अवकाळीचं संकट, ५ फेब्रुवारीपर्यंत धोक्याचा इशारा; काय आहे कारण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जळगाव जिल्ह्यात Western Disturbance मुळे २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, रब्बी पिकांचे आणि केळीच्या बागांचे नुकसान होण्याची भीती.
जळगाव, प्रतिनिधी विजय वाघमारे: जळगाव जिल्ह्यातील बळीराजावर निसर्गाची वक्रदृष्टी कायम आहे. २७ जानेवारी रोजी झालेल्या गारपिटीने आधीच कंबरडे मोडले असताना, आता पुन्हा एकदा १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान दुपारनंतर जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, यामुळे रब्बी पिकांचे उरलेसुरले नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वादळी वारा आणि 'ढगफुटी'चा धोका
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात सक्रिय असलेल्या Western Disturbance जळगाव जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान दररोज दुपारी ४ वाजेनंतर पावसाचा जोर वाढू शकतो. पाऊस पडताना ताशी ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काही तालुक्यांमध्ये हा पाऊस तुरळक असेल, तर काही ठिकाणी अत्यंत कमी वेळात जास्त पाऊस म्हणजेच 'ढगफुटी' सदृश पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
पिकांच्या नुकसानीचे संकट वाढले
जिल्ह्यात सध्या गहू, हरभरा, मका ही पिके काढणीवर आली आहेत. तर केळीच्या बागा आधीच गेल्या आठवड्यातील वादळाने जमीनदोस्त झाल्या आहेत. आता पुन्हा वाऱ्याचा वेग वाढल्यास उभी पिके आडवी होतील आणि बागांचे मोठे नुकसान होईल. प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
advertisement
तापमानातही बदल
१ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल्याने थंडी पूर्णपणे गायब झाली असून किमान तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पावसाच्या सरींनंतर पुन्हा एकदा हवेत गारवा निर्माण होऊन वातावरणात मोठे चढ-उतार पाहायला मिळतील. तर 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर होणार आहे. जळगावात अचानक पाऊस आल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी पिकांचं नुकसान झालं आहे. तर उद्यापासून पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 7:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फेब्रुवारी सुरू होताच गारपीट अन् अवकाळीचं संकट, ५ फेब्रुवारीपर्यंत धोक्याचा इशारा; काय आहे कारण?








