advertisement

पोलीस वेळेवर आले म्हणून वाचले; मुलं पकडणाऱ्या टोळीचा संशय, जळगावात चौघांना बेदम मारहाण

Last Updated:

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
जळगाव, 30 डिसेंबर, नितीन नांदूरकर :  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. लहान मुलं पकडणारी टोळी असल्याच्या संशयातून चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस वेळेत आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणात 14 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लहान मुले पकडणारी टोळी असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे. मारहाण होत असताना पारोळा पोलिसांचे पथक वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. ही थरारक घटना पारोळा तालुक्यातील लोणी येथे गुरुवारी रात्री घडली. जखमी चारही तरुण जळगावचे आहेत. नरेंद्र सुनील जाधव, नसिरुद्दीन शहाबुद्दीन शेख, शेख मो. अनास मो. अब्दुल्ला,आणि तेजाज एजाज शेख अशी जखमींची नावे आहेत.
advertisement
हे चारही जण कासोदा येथे गुरुवारी रात्री आले होते. मात्र  तेथील काही लोकांना या तरुणांच्या वेशभूषेमुळे संशय आला. त्यांनी या तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कारमध्ये बसून पसार झाले. त्यामुळे त्यांच्याबद्दल संशय बळावला. यामुळचे नागरिकांनी पुढे कार अडवून त्या चौघांना चोप दिला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरोधात पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 14 जणांना अटक करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
पोलीस वेळेवर आले म्हणून वाचले; मुलं पकडणाऱ्या टोळीचा संशय, जळगावात चौघांना बेदम मारहाण
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement