भटक्या विमुक्त प्रजेची कहाणी उलगडणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन, साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने यांनी केला अनुवाद
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 फेब्रुवारीला या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.
अमळनेर (जळगाव) : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 फेब्रुवारीला या साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यानंतर साने गुरुजी साहित्य नगरीतून म्हणजे अमळनेर येथे काल साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले.
सुधा साने-बोडा यांच्या पुस्तकाचे उद्घाटन -
3 फेब्रुवारी 2024 रोजी काल संध्याकाळी साडेसात वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर येथील साधना प्रकाशनाच्या स्टॉलवर सुधा साने-बोडा यांनी अनुवाद केलेल्या 'आधार नसलेली माणसं' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी सुधाताई, साधनातील सहकारी तसेच अन्य वाचक, हितचिंतक उपस्थित होते. गुजरातमधील भटक्या विमुक्त प्रजेच्या कथा-व्यथा सांगणारे 29 लेख असलेले हे मूळ गुजराती पुस्तक मित्तल पटेल यांनी लिहिलेले आहे.
advertisement

सुधा साने यांनीअनुवादित केलेले पुस्तक.
उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित -
महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान, तत्वज्ञान रूजविणार अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. राज्याचा सर्वांगिण विकासाबरोबर साहित्य, कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाईल. साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नये, याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. मराठी साहित्य संमेलनास गौरवाशाली परंपरा आहे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. प्रताप हायस्कूलमध्ये सानेगुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते. साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक झाले पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संमेलनाच्या उद्घटनाच्या दिवशी व्यक्त केली.
advertisement
परवा 2 फेब्रुवारीला या संमेलनाच्या उद्घनाला संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. उद्घाटक म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, आज 4 फेब्रुवारी रोजी आज या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.
Location :
Amalner,Jalgaon,Maharashtra
First Published :
Feb 04, 2024 4:14 PM IST
मराठी बातम्या/जळगाव/
भटक्या विमुक्त प्रजेची कहाणी उलगडणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन, साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने यांनी केला अनुवाद








