Ajit Pawar : अजितदादा पुन्हा नाराज? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
जळगाव, 24 सप्टेंबर, नितीन नांदूरकर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याचं निमंत्रण असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर राहिले, यावर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांच्या कार्यक्रमाला हजर राहिचं की नाही हा अजित पवार यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला वाटतं अमित शाहांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात गैरहजर राहून अजित पवार यांनी त्यांच्यामधली नाराजीची भावना व्यक्त केली असावी, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
अमित शहा यांच्या दौऱ्याचं निमंत्रण असूनही अजित पवार गौरहजर राहिले. कार्यक्रमाला हजर राहिचं की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना डावललं जात आहे. त्यामुळे अजित पवार यांनी या कार्यक्रमाला गैरहजर राहून आपल्यामधली नाराजीची भावना व्यक्त केली असावी असं वाटत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. खडसे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शाळांच्या खासगीकरणावरून देखील सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शाळेचं खासगीकरण अथवा ती दुसऱ्या लोकांना चालवायला देणं म्हणजेच हे शाळा चालवण्यात आणि शिक्षण देण्यात असमर्थ ठरले आहेत असा टोला खडसे यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वांना शिक्षण देणं ही शासनाची संविधानिक आणि घटनात्मक जबाबदारी आहे. खासगी शाळांच्या तुलनेत शासनानं सरकारी शाळांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा द्याव्यात शिक्षक भरती करावी, मात्र शासन शाळा चालवण्यात आणि शिक्षण देण्यास अपयशी ठरत आहे. शाळांचे खासगीकर होत असून, हजारो शाळा या खासगी लोकांना चालवण्यासाठी दिल्या जात असल्याचा हल्लाबोल खडसे यांनी केला आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 24, 2023 8:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Ajit Pawar : अजितदादा पुन्हा नाराज? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण









