कांद्याच्या दरात मोठी उसळी; ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचं बजेट कोलमडणार!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, याचा फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनिधी : पावसाचे कमबॅक झाले असतानाच उन्हाळी कांद्याला तेजीची झळाळी मिळत आहे. चाळीसगाव बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला साडेचार हजारांचा दर मिळाला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्याभरात सातत्याने कांद्याला चढा दर मिळत आहे. मध्यंतरी ४६०० रुपये प्रतिक्विंटल असाही भाव मिळाला होता.
कांद्यावरील निर्यात बंदी हटविल्यानंतर घाऊक बाजारात कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत किरकोळ बाजारात कांदा ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने विकत घ्यावा लागत आहे. मात्र, उन्हाळी कांद्याची आवक ओसरल्यावर निर्यातीबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जरी भाव वाढले असले तरी, शेतकऱ्यांकडील कांदा आता संपत आला आहे. त्यामुळे शेवटी मिळालेली ही दरवाढीची झळाळी फारशी लाभदायक नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
गृहिणींचं बजेट कोलमडणार
दरम्यान आता ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे दर कडाडले आहेत. कांद्याचे तर प्रति किलो साठ ते सत्तर रुपये किलोंवर पोहोचले आहेत. या महागाईचा मोठा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता असून, गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे. दुसरीकडे आता शेतकऱ्यांजवळी कांदा संपत आहे, त्यामुळे त्यांना देखील या दरवाढीचा फारसा फायदा होण्याची शक्यता नाहीये.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 27, 2024 10:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
कांद्याच्या दरात मोठी उसळी; ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचं बजेट कोलमडणार!










