Jalgaon Fire News : जळगावमध्ये अग्नितांडव! केमिकल कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू, 4 जण अडकल्याची भीती
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jalgaon Factory Blast: जळगावमध्ये केमिकल कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाल्याचे समजत आहे.
जळगाव, (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : जळगावमध्ये एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर संपूर्ण कंपनीला आग लागली. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कारखान्यात अनेक जण अडकल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, घटनेनंतर आग विझवण्यासाठी आग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जवळपास 30 अग्निशामक गाड्या तेथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जळगावातील केमिकल कंपनीच्या भीषण आगीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती आली समोर आहे. समाधान पाटील असे मयत कामगाराचे नाव आहे. आगीत जळालेल्या एका कामगाराचा मृतदेह आढळून आल्याची प्रशासनाने माहिती दिली. कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आग लागली त्यावेळी कंपनीत एकूण 25 कर्मचारी होते. एकूण कामगारांपैकी 23 कामगार हे जखमी झाल्याने त्यांच्यावर सुरू आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीच्या घटनेत दोन कामगार बेपत्ता असून एकाचा मृतदेह सापडला तर अद्यापही एकाचा शोध सुरू आहे.
advertisement
जखमी 23 जणांपैकी 5 कामगार 70 ते 90 टक्के भजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जिल्हाभरातील सर्व नगरपालिकांच्या अग्निशमन बंबाच्या मार्फत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी दाखल झालेय. तीस ते चाळीस अग्नीशमन दलाची वाहाने घटनास्थळी दाखल झाली आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. केमिकलचा स्फोट होत असल्याने आग आणखी वाढतच चालली आहे. आगीचे लोट हवेत दूरवर पसरलेत. आग अटोक्यात येत नसल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Apr 17, 2024 4:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon Fire News : जळगावमध्ये अग्नितांडव! केमिकल कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू, 4 जण अडकल्याची भीती










