सणासुदीला घरात मिठाई आणताय? सावधान महाराष्ट्रात पोलिसांची मोठी कारवाई
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
भुसावळ, 23 सप्टेंबर : भुसावळमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. गुजरातमधून येणाऱ्या बनावट खव्याचा मोठा साठा पोलिसांनी भुसावळमध्ये पकडला आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे, त्यामुळे याकाळात मिठाईंना मोठी मागणी असते. खव्यापासून मिठाईचे विविध प्रकार तयार केले जातात. त्यामुळे खव्याला मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेऊन बनावट खव्याची विक्री देखील मोठ्याप्रमाणात वाढली आहे.
भुसाववळमध्ये बनावट खवा विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली. गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या बनावट खव्याचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे हा खवा मुक्ताईनगर, मलकापूर आणि विदर्भात विक्री करण्यात येणार होता.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातच्या अहमदाबादमधून ट्रॅव्हल्समध्ये 178 बॅग खवा हा महाराष्ट्रात विक्रीसाठी आला होता. तब्बल 5340 किलो खवा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. एकूण 11 लाख 874 रुपये एवढी या जप्त करण्यात आलेल्या खव्याची किंमत आहे. पोलिसांनी खवा जप्त करून पुढील सूत्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपावली आहे. आता या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन पुढील तपास करत आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 23, 2023 7:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
सणासुदीला घरात मिठाई आणताय? सावधान महाराष्ट्रात पोलिसांची मोठी कारवाई









