advertisement

बांगलादेश सीमेवर दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; 4 महिन्यांनी होणार होते निवृत्त

Last Updated:

सोमवारी बांगलादेश सीमेवर त्रिपुरात दहशतवादी हल्ल्यात गोळी लागल्याने जवान अरुण बडगुजर शहीद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

News18
News18
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी
चोपडा : बांगलादेश सीमेवर बीएसएफमध्ये कार्यरत असणारा महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद झाला. दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. जवान अरुण दिलीप बडगुजर असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. सोमवारी दुपारी बांगलादेश सीमेवर त्रिपुरात ही घटना घडली. गेल्या 20 वर्षांपासून बडगुजर बीएसएफमध्ये होते.
दहशतवाद्यांशी लढताना चोपड्याचे जवान अरुण बडगुजर हे शहीद झाले. त्रिपुरा येथे बीएसएफमध्ये ते कर्तव्यावर होते.  बांगलादेशाच्या सीमेवर त्रिपुरा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. अरुण दिलीप बडगुजर हे चोपडा साईबाबा कॉलनीमधील रहिवासी होते. 20 वर्षे ते बीएसफमध्ये कार्यरत होते. त्यांची निवृत्ती अवघ्या ४ महिन्यांवर आली होती.
advertisement
दरम्यान,  सोमवारी बांगलादेश सीमेवर त्रिपुरात दहशतवादी हल्ल्यात गोळी लागल्याने ते शहीद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथून त्यांचे पार्थिव बीएसएफच्या वाहनाने मूळ गावी आणले जाणार आहे. अरुण दिलीप बडगुजर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यंसस्कार होणार आहेत.
चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी अरुण दिलीप बडगुजर यांना वीरमरण आल्याची माहिती कुटुंबियांना दिली. यानंतर कुटुंबियांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. अरुण बडगुजर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. चार महिन्यांनी बडगुजर निवृत्त होणार होते. पण त्याआधीच त्यांना वीरमऱण आलं. यामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
बांगलादेश सीमेवर दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; 4 महिन्यांनी होणार होते निवृत्त
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement