Crime : जळगावमध्ये जम्बो कुंटणखान्यावर छापा, 10 'डर्टी आंटी'सह 60 तरुणी ताब्यात
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पोलिसांनी 5 दलाल, 10 मालकीण महिलांसह 60 महिलांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले होते.
इम्तियाज अहमद, जळगाव : चोपडा इथं नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६० महिलांना ताब्यात घेतलं आहे. तर कुंटणखाना चालवणाऱ्या ११ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता ही कारवाई केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील नगर पालिकेच्या पाठीमागील परिसरातच अवैधरित्या कुंटणखाना सुरू होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने कारवाई केली.
पथकाने सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यात जिल्ह्यासह परराज्यातील 60 तरुणी आढळून आल्या आहेत. तर कुंटणखाना चालवणाऱ्या 10 महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकली, त्यावेळी एकही गिन्हाईक नव्हते. पोलिसांनी 5 दलाल, 10 मालकीण महिलांसह 60 महिलांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले होते. या परिसरात पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात, अशी चर्चा आहे.
advertisement
कुंटणखाना सुरु असलेल्या ठिकाणी ग्राहक म्हणून येत असलेल्या लोकांच्या दुचाकींची चोरी होत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. पोलिस अधिक्षकांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत या दुचाकी प्रकरणाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकली. त्यातून दुचाकी चोऱ्यांवरही प्रकाश पडू शकेल, असा पोलिसांना विश्वास आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2024 3:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Crime : जळगावमध्ये जम्बो कुंटणखान्यावर छापा, 10 'डर्टी आंटी'सह 60 तरुणी ताब्यात







