Jalgaon News : खेळताना लोखंडी सळी छातीत घुसून चिमुकल्याचा मृत्यू, दिवाळीत कुुटुंबावर दु:खाचा डोंगर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळत असताना लोखंडी सळी छातीत घुसून चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
जळगाव, 14 नोव्हेंबर, नितीन नांदूरकर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन सणासुदिच्या काळात घडलेल्या या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे. गटारीच्या बांधकामाची उघडी असलेली लोखंडी सळी छातीत घुसून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विशाल रवींद्र भिल असं या मुलाचं नाव आहे. गटारीचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा मुलगा खेळत होता. खेळत असताना खाली पडल्यामुळे सळी छातीत घुसली, यातच त्याचा मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन सणासुदिच्या काळात घडलेल्या या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे. गटारीच्या बांधकामाची उघडी असलेली लोखंडी सळी छातीत घुसून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. विशाल रवींद्र भिल असं या मुलाचं नाव आहे. गटारीचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा मुलगा खेळत होता. खेळत असताना खाली पडल्यामुळे सळी छातीत घुसली, यातच त्याचा मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना पाचोरा येथील जुन्या धरणगाव रस्त्यालगत घडली आहे. गटारीच्या बांधकामाची उघडी असलेली लोखंडी सळी छातीत घुसून विशाल याचा मृत्यू झाला आहे. तो बांधकाम सुरू असलेल्या गटारी जवळ खेळत होता. खेळताना तो खाली पडला. यावेळी तिथे असलेली लोखंडी सळी त्याच्या छातीत घुसली. या घटनेत विशालचा जागीच मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
दरम्यान या प्रकरणात स्थानिक नागरिकांकडून ठेकेदारावर आरोप करण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणात एरंडोल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Nov 14, 2023 8:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon News : खेळताना लोखंडी सळी छातीत घुसून चिमुकल्याचा मृत्यू, दिवाळीत कुुटुंबावर दु:खाचा डोंगर





