advertisement

Eknath Khadse : सून रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने माघार घेतली? नाथाभाऊ पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

Last Updated:

Eknath Khadse : सून रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने एकनाथ खडसे यांनी माघार घेतल्याचा आरोप होत आहे. यावर खडसेंनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.

सून रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने माघार घेतली?
सून रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने माघार घेतली?
जळगाव, (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : लोकसभा निवणुका जाहीर झाल्या असून राजकीय मैदानात आरोपांच्या फैरी झडत आहेत. सून रक्षा खडसे हिला उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी निवडणुकीत माघार घेतली, असा आरोप सतीश पाटील तसेच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केलं होतं. यावर एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं.
रोहिणी खडसे का लढणार नाही?
पवार गटाचे नेते एकनाथ खडसे म्हणाले, की नाथाभाऊने जे मिळवलं आहे ते कष्टाने, मेहनतीने आणि कार्यकर्त्यांच्या बळावर मिळवलं आहे. मी लाचार माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे आणि लढत आलो आहे. सगळेच दगड का मारायला लागले, याचा अर्थ नाथाभाऊ मजबुत आहे. एक अकेला सबको भारी, तुम चिंता मत करो. मी काय करतो? माझा पक्ष मला सांगेल, हा कोण मला सांगणारा, गल्लीतील माणूस, असा पलटवार खडसे यांनी विरोधकांवर केला आहे. रोहिणी खडसे यांनी कधीही लोकसभा डोळ्यासमोर ठेवलेली नाही. त्या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे रोहिणी ताईंचा विषय येत नाही. अजित पवार यांच्यासोबत सर्वजण गेले. मात्र, मी शरद पवार यांच्या सोबतच राहिलो, अशीगी आठवण खडसे यांनी करुन दिली.
advertisement
मी सत्तेसाठी पवारांशी गद्दारी केली नाही : खडसे
सत्तेसाठी अजित पवार गटात जायला मला वाव होता. मात्र, मी पळून गेलो नाही. मी विधान परिषदेचा गटनेता राहिलेला आहे. संजय पवार हा खूप छोटा आणि किरकोळ माणूस आहे. संजय पवार हा आयुष्यात एकही निवडणूक हा लोकांमधून निवडून आलेला नाही. मागच्या दरवाजांनी यायचं. आता ते शरद पवार साहेबांच्या जीवावर निवडून आलेत. मी अजितदादा किंवा त्यांच्या मतावर निवडून आलेलो नाही. तर मी शरद पवार साहेबांच्या मतदानावर निवडून आलेलो आहे. यांनी उलट शरद पवार यांच्यासोबत गद्दारी केली आणि अजित पवार यांचा गट वेगळा केला. शरद पवार साहेबांसोबत विश्वासघात केला. मी महाराष्ट्रातला नेता आहे. राजकीय माणूस आहे. माझी उंची ही अजित पवार यांच्यावर टीका करणे एवढी आहे, असाही टोला खडसेंनी लगावला.
advertisement
म्हणून मी निवडणूक लढवणार नाही : खडसे
सतीश पाटील हे माझे मार्गदर्शक आहेत. त्यांनी जे वक्तव्य केले ते गैरसमजाच्या आधारावर केलं. त्यांनी मला विचारलं असतं तर मी त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली असती. माझे दोन ब्लॉकेज शिल्लक आहे, त्याचे ऑपरेशन करायचे आहे. थेलियम टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की ताण घेता येणार नाही, म्हणून मी निवडणुक लढवत नाही. माझ्या या परिस्थितीबाबत वेळोवेळी शरद पवार यांना कल्पना दिली होती. त्यावेळी रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झालेले नव्हती. समोर कोणीही असो मी निवडणुकींना घाबरणारा माणूस नाही. आजपर्यंत मी घाबरलेलो नाही, निवडून येत आलेलो आहे. मी कुणा कानाकोपऱ्यातून नाही तर सार्वजनिकपणे लोकांमधून निवडून आलेलो आहे. त्यामुळे माझे मंत्री सतीश पाटील यांनी उगाच चुकीचं वक्तव्य करून गैरसमज पसरू नये, असा सल्ला खडसे यांनी दिला.
advertisement
एक मजबूत कार्यकर्ता रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार असेल अशा काही माणसांची शिफारस आणि पक्षाकडे केलेली आहे. पुढील दोन दिवसात उमेदवार कोण असे हे तुमच्यासमोर येईल. आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू. सून रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार करणार का हे विचारला असता. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे करत आहेत ना? मग आता मला काय अडचण आली? राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. जो पक्ष मला ज्या पद्धतीने आले ते त्या पद्धतीने मी काम करेल. पक्षाच्या नेत्यांनी मला विचारलं तर मी त्यांना सांगेल. अशा आल्तूफाल्तू कोणीही मला विचारलं तर मी त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही, असं सडेतोड उत्तर खडसे यांनी दिलं.
advertisement
रक्षाताई माझी सून आहे. महाभारतात भीष्मांनी अर्जुनाला विजयाचा आशीर्वाद दिला होता. मी सर्वांना आशीर्वाद सदिच्छा देणारच आहेत. स्मिता वाघ जरी माझे पाय धरायला आले तरी तिला शुभेच्छा देईल. राजकारणात मन मोकळं असावं लागतं. मन कोत राहून चालत नाही, असाही टोला खडसेंनी लगावला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Eknath Khadse : सून रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने माघार घेतली? नाथाभाऊ पहिल्यांदाच स्पष्ट बोलले
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement