मोठी बातमी! अशोक चव्हाणांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शनिवारी अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
जालना, रवी जयस्वाल प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली आहे. रात्री उशिरा अशोक चव्हाण यांनी अचानक अंतरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जरांगे पाटील व अशोकराव चव्हाण यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने सगे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, आणि जोपर्यंत मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. येत्या 24 तारखेला समाजाची बैठक बोलावली असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हंटलंय. मात्र अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे. सरकारनं जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला स्वातंत्र दहा टक्के आरक्षण दिलं, मात्र आम्हाला ते आरक्षण नको तर ओबीसीमधून आरक्षण द्या, सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा या आपल्या मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी झाली नाही तर गावागावातून मराठा समाज लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Mar 17, 2024 2:05 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
मोठी बातमी! अशोक चव्हाणांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; निवडणुकीच्या तोंडावर घडामोडींना वेग








