Eknath Khadse : अजित पवारांनी विचारलं, मिटकरींचा फोन आला पण...; एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
खडसेंनी शरद पवारांना घट्ट पकडून राहावं असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. या वक्तव्याला आता एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.
नितीन नांदुरकर, जळगाव, 25 सप्टेंबर : एकनाथ खडसे हे आमच्यासोबत येण्यास आग्रही असून ते अजित पवार यांना बोलले असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. या वक्तव्याला आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. मी अजित पवारांसोबत नाही. मला अजित पवारांनी विचारलं होतं. मला मिटकरी यांचा फोन आलेला पण मी स्पष्ट शब्दात सांगितले कुठल्याही परिस्थितीत आम्ही पवार साहेबांची साथ सोडणार नाही असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
मी सत्तेसाठी कोणाचाही हाजी आजी करणारा माणूस नाही. मी कोणाच्याही मागे फोटो काढणारा माणूस नाही. पुढे जाऊन मी संकट मोचक आहे असं सांगून पुढे पुढे करणारा माणूस मी नाही. स्वाभिमानाने जगलो, स्वाभिमानाने जगेल. सत्तेत जायचं असतं तर कधीच गेलो असतो असे म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
advertisement
गिरीश महाजन यांच्यासारखं कोणालाही पुढे आणलं नसतं. आम्ही यांना केव्हाच मागे सारलं असतं. मात्र माझ्या तत्वात तुम्हाला माहिती कोण कोणाच्या मागे फिरत असतो फोटोसाठी फिरत असतो. मला अशी गरज नाही असं म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.
advertisement
अजित दादांनी जाहीर करावं की मी त्यांच्याकडे आलो आहे. मला भाजपावाले ही आग्रह करतात. बावनकुळे साहेबांनी उघड सांगितले तरी मी गेलो नाही तर मी अजित पवारांकडे कसं जाणार? असा प्रश्न उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे आमच्याकडे येण्यासाठी आग्रही असून खडसे अजित पवारांना बोलले, हे मला माहीत आहे. खडसेंनी शरद पवारांना घट्ट पकडून राहावं असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर आमदार एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण देत गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 25, 2023 9:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Eknath Khadse : अजित पवारांनी विचारलं, मिटकरींचा फोन आला पण...; एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट







