Lok Sabha Elections : उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी रक्षा खडसेंना नाथाभाऊंच्या शुभेच्छा; म्हणाले 'सहकार्य करणार...'
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
भाजपनं रक्षा खडसे यांना रावेरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
जळगाव, इम्जियाज अहमद, प्रतिनिधी : भाजपनं रक्षा खडसे यांना रावेरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावर आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रक्षाताई आज तिसऱ्यांना लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी दोन टर्म गेली दहा वर्ष मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं काम केलं असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
'रक्षाताई आज तिसऱ्यांदा लोकसभेसाठी आपला उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्या आहेत. त्यांनी गेले दहा वर्ष पार्लमेंटमध्ये आणि मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं काम केलं. विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडले. भारतीय जनता पार्टीतील नेत्यांच्या आशीर्वादामुळे, केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं आहे.
एवढ्या लहान वयामध्ये 36 व्या वर्षी त्या तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीमध्ये आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. सर्वांच्या सहकार्यामुळे रक्षा खडसे या अधिक चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असा मला विश्वास आहे. माझा अजून भाजपमध्ये प्रवेश झाला नाही. परंतु रक्षा खडसे या माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्या माझ्या सून नाही तर मुलगी आहे. भारती जनता पर्टीमध्ये होऊ घातलेल्या माझ्या प्रवेशाच्या आधारावर मी त्यांना सहकार्य करणार आहे. माझ्या सहकार्यामुळे त्यांना निश्चित प्रमाणात चांगलं मताधिक्य मिळेल. त्यांचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी मी उपस्थित राहणार नाही, कारण मी अजून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Apr 25, 2024 9:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Lok Sabha Elections : उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी रक्षा खडसेंना नाथाभाऊंच्या शुभेच्छा; म्हणाले 'सहकार्य करणार...'










