पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडले, शेतकऱ्यांना बसला मोठा फटका; नेमकं काय कारण

Last Updated:

निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांना उत्पन्नात घट देऊन गेला आहे. कापसाचे उत्पादन कमी असले तरी भाव मात्र गडगडतच आहे.

News18
News18
नितीन नांदुरकर, मुक्ताईनगर : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच पिकाचे उथ्पादन कमी आणि त्यात दरही घसरल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार ५०० रुपये दर मिळाला होता. यंदा ६ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. गेल्या जानेवारीच्या तुलनेत तब्बल १८०० रुपयांची तूट कापसाच्या दरात आली आहे. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापसाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली जात आहे.
यावर्षी कापसाची आवक कमी आहे. निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांना उत्पन्नात घट देऊन गेला आहे. कापसाचे उत्पादन कमी असले तरी भाव मात्र गडगडतच आहे. गेल्या जानेवारीच्या तुलनेत १८०० रुपयांनी झालेली दरातील घसरण चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
तीन वर्षापूर्वी कापसाने दहा हजारी आकडा गाठला होता. गत दोन वर्षांपासून कापसाचे भाव वाढतील म्हणून कापसाचा साठा केला. भाव तर वाढले नाहीत उलट साठा केलेल्या कापसाचे वजन कमी झाले. असा दुहेरी फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी सरकारकडून मदतीची अत्यंत गरज आहे.
advertisement
मंदी पाहता आता पुन्हा कापूस साठा करणे परवडण्यासारखे नसल्याचे जाणकार म्हणतात. इकडे मात्र जिवाचे रान करून, कर्जाच्या ओझ्याखाली दाबले जात असताना कापूस पीक घेतले. दरवाढ झाली तर लोकांचे देणे देता येईल या भावड्या आशेवर शेतकरी आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडले, शेतकऱ्यांना बसला मोठा फटका; नेमकं काय कारण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement