advertisement

जळगावात पुण्यासारखीच घटना, बड्या बापाच्या पोराने चौघांना चिरडलं, आरोपी मोकाट, कारमध्ये गांजाच्या पुड्या

Last Updated:

जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी येथे हा भीषण अपघात घडला, अपघातातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाहीये.

News18
News18
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनिधी :  जळगावातील रामदेव वाडी जवळ 17 दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला, मात्र असे असतानाही या अपघातातील आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही. मुंबईत उपचार घेत असल्याचं कारण देत आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. विशेष म्हणजे या अपघातग्रस्त कारमध्ये गांजाच्या पुड्या आढळल्या आहेत. यातील दोघा संशयीतांचे ब्लड सॅम्पल 17 दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप मिळाले नाही. या अपघातातील आरेपीमध्ये जळगावतील मोठ्या बिल्डरचा आणि नेत्याचा मुलगा असल्याने पोलीस गप्प बसले का? अशी चर्चा जळगावात आता रंगत आहे.
जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी येथे 17 दिवसांपूर्वी एक भीषण अपघात झाला होता. एक महिला आपली दोन मुलं आणि भाच्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना एका सुसाट कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रामदेव वाडी गावातील जमावाने अपघातग्रस्त कारमधील दोघांना बाहेर काढले. कारमधील या दोघांनीही नशा केल्याचं दिसून आलं. तर त्यांच्या गाडीत गांजाच्या पुड्या असल्याचेही पोलीस तपासात समोर आले. मात्र 17 दिवस उलटले तरी देखील अद्यापही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये. यामुळे आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.
advertisement
आशा स्वयंसेविका राणी चव्हाण या त्यांच्या दोन मुलं आणि एक भाच्याला घेऊन घराकडे परतत असताना 7 मे रोजी भरधाव कारणे त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये  राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्या दुचाकीवर असलेल्या तीनही मुलांचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार ज्या कारने धडक दिली त्या कारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याचा मुलगा होता, तर  दुसरा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे. अपघातानंतर आरोपी ही जखमी झाले, त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
दरम्यान आरोपींना जेव्हा रुग्णालयात भरती केलं तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार ते दोघेही दारूच्या नशेत होते. ज्या कारणे धडक दिली त्या गाडीमध्ये गांजा ही सापडलेला आहे. मात्र 17 दिवस उलटून गेले तरीही आरोपीचे अद्याप ब्लड रिपोर्ट आलेला नाहीये. आरोपी गेल्या 17 दिवसापासून मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते जसे बरे झाले तसं त्यांना लगेच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र या प्रकरमात महिलेचे कुटुंब आणि ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांची आंदोलनाचा इशारा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जळगावात पुण्यासारखीच घटना, बड्या बापाच्या पोराने चौघांना चिरडलं, आरोपी मोकाट, कारमध्ये गांजाच्या पुड्या
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement