Breaking news : गोळीबाराच्या घटनेत आणखी एका माजी नगरसेवकाचा मृत्यू
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मोठी बातमी समोर येत आहे, गोळीबाराच्या घटनेत आणखी एका माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव, शरद जाधव, प्रतिनिधी : जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. तीन दिवसांपूर्वी चाळीसगावमधील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता, या घटनेत त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. उपचारादरम्यान पहाटे रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जाखमी झाले होते. त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीनं नाशिकच्या अशोका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवानं आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
advertisement
चाळीसगावमधील स्टेशनरोड भागात बाळू मोरे यांचं वास्तव्य होतं. आनंदवाडी, शिंदी कॉलनी परिसरातून ते अपक्ष तसंच भाजपच्या तिकिटावरही नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. त्यांच्यावर गोळीबार का झाला ? हे अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणात जे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं आहे, त्याच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे,
advertisement
दरम्यान राजकीय पदाधिकाऱ्यांवर मागील आठवडाभरात गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहेत. उल्हासनगर, चाळीसगाव आणि दहीसरमध्ये या घटना घडल्या. या तीन घटनेत दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. दहीसर गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर आज महेंद्र मोरे यांचा देखील मृत्यू झाला आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Feb 10, 2024 7:51 AM IST








