Gram Panchayat Election : महाजनांनी गड राखला; शिवसेनेची जोरदार मुसंडी, 'मविआ'ला जळगावात मोठा धक्का!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जळगावात भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे, शिवसेनेला देखील मोठं यश मिळालं आहे.
जळगाव, 6 नोव्हेंबर, नितीन नांदूरकर : रविवारी राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या वीस हजारांपेक्षा अधिक जागांसाठी मतदान झालं. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता ग्रामपंचायत निकालांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान आता ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल स्पष्ट होताना दिसत आहेत. जळगावमध्ये भाजपनं विजयी घोडदौड सूरू ठेवली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जळगाव जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींवर भाजपानं आपला झेंडा फडकवला आहे.
जळगाव जिल्ह्यात रविवारी 173 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. आज मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपनं चाळीस ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे शिवसेनेनं देखील जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 38 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेनं विजय मिळवला आहे. तर दहा ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाची सत्ता आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाला अवघ्या सहा ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सात तर काँग्रेसची दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आली आहे. तर 11 ठिकाणी स्थानिक आघाड्यांचा विजय झाला आहे.
advertisement
पंकजा मुंडेंना धक्का
परळी विधानसभा मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं होतं. या ग्रामपचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. सहा पैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये धनंजय मुंडे गटानं विजय मिळवला आहे. तर अवघ्या एक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे.
दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल म्हणून निवडणूक लढवली जाते, त्यामुळे कोणाताही गट हा पक्षाच्या तिकीटावर प्रत्यक्ष निवडणूक लढवत नाही. या पॅनलला राजकीय पक्षांचं समर्थन असतं.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Nov 06, 2023 2:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Gram Panchayat Election : महाजनांनी गड राखला; शिवसेनेची जोरदार मुसंडी, 'मविआ'ला जळगावात मोठा धक्का!









