advertisement

'राष्ट्रवादीवाले आमच्यासोबत आले अन् खोके गायब झाले'; जळगावात बोलताना गुलाबराव पाटलांची चौफेर फटकेबाजी

Last Updated:

जळगावमध्ये बोलताना गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
जळगाव, 17 सप्टेंबर, नितीन नांदूरकर :  आमच्यावर पण खोके म्हणून खूप टीका झाली, मात्र बरं झाला राष्ट्रवादीवाले आमच्यासोबत आले आणि खोके गायब झाले. कोणता खोका कोणी नेला ते अजून पण सापडत नाहीये, अशी मिश्किल टिप्पणी करत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली, ते जळगावातील दिव्यांगांच्या कार्यक्रमात भाषण करताना बोलत होते.
दरम्यान शनिवारी मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आठ वर्षांत विरोधकांची काही बोब पडली नाही, इतकी वर्ष बैठक का घेतली नाही असा सवाल त्यांनी उपस्थि केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, काही नसलं की विरोध करायचा एवढा एकमेव उपक्रम विरोधकांकडून सुरू आहे. मात्र आम्ही त्यांना कामातून उत्तर देतो असं पाटील यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
त्यांनी यावेळी बोलतान शासन दिव्यांगांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाचं देखील कौतुक केलं आहे. दिव्यांगांना सर्व सुख सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यातल्या शासनाचा जो उपक्रम आहे हा खूप चांगला उपक्रम आहे. आगामी काळात दिव्यांगांना 500 सायकलींचे वाटप केले जाणार आहे, त्या माध्यमातून त्यांनी केवळ गावात न फिरता त्या सायकलवरून त्यांना काही व्यवसाय देखील सुरू करता येईल, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
'राष्ट्रवादीवाले आमच्यासोबत आले अन् खोके गायब झाले'; जळगावात बोलताना गुलाबराव पाटलांची चौफेर फटकेबाजी
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement